सराईत गुन्हेगाराने रोखले पुणे पोलिसांवर पिस्तूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर गुन्हेगाराने पिस्तूल रोखून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पंरतू पुणे पोलिसांच्या चपळाईमुळे गुन्हेगार गजाआड झाला पण झटापटीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. हा थरार पांगुळ आळी गणेश पेठ पुणे येथे मंगळवारी (दि.३) सायंकाळी घडला. रोहित माने (रा. लोहीयानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दिनेश भांदुर्गे असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
[amazon_link asins=’B01HCSV3MQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac026ef7-7f97-11e8-ba34-8925ef67f5db’]

आरोपी माने याने १४ जुन रोजी मंडई येथे सुरज महादेव बनसोडे (रा. मंगळारपेठ पुणे) याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर आरोपी माने फरार झाला होता. माने हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार आहे. मंगळवारी (दि.३) फरासखाना पोलीस ठाण्यातील तपासी पथकाचे पोलीस उप निरीक्षक व कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल हर्षल शिंदे यांना आरोपी माने हा पांगुळ आळी गणेश पेठ येथे असून त्याच्या कमरेला गावठी बनावटीची पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी पांगुळ आळीत सापळा रचला. आरोपी माने आणि पोलीस कर्मचऱ्यांची नजरा नजर होताच माने पळून जाऊ लागला. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना काही अंतरावर जाऊन त्याने कंबरेची पिस्तूल काढून पोलिसांच्या दिशेने रोखली. तसेच पुढे येवु नका आला तर याद राखा असे म्हणून पोलिसांना थांबण्यास सांगितले. यावेळी पथकातील महेंद्र पाटील यांनी त्याला शरण येण्यास सांगत असताना  पोलीस नाईक दिनेश भांदुर्गे व पोलीस हवालदार योगेश जगताप यांनी पाठिमागून जाऊन मिठी मारुन त्याला जमीनीवर पाडले. त्याच्या हातातील पिस्तूल काढून त्याची अंगझडती घेतली असता पँटच्या खिशामध्ये दोन जीवंत काडतुसे मिळाली. या झटापटीत पोलीस कर्मचारी दिनेश भांदुर्गे यांच्या उजव्या हातास किरकोळ मार लागल्याने ते जखमी झाले. आरोपी रोहित माने हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
[amazon_link asins=’B06XBCVVDV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1441b54-7f97-11e8-b71c-5be348f600ad’]

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग रविंद्र सेनगावकर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त शहर विभाग प्रदिप आफळे यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे, दिनेश भांदुर्गे, बापुसाहेब खुटवट, संदीप पाटील, विनायक शिंदे, योगेश जगातप, संजय गायकवाड, विशाल चौगुले, शंकर संपते, शंकर कुंभार, अमोल सरडे, अमेय रसाळ, विकास बो-हाडे, महावीर वलटे यांच्या पथकाने केली.