रिक्षाचालकाकडे सापडला गावठी कट्टा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवसभर रस्त्यावर फिरणारे, चौकाच्या कोपऱ्यात घोळका करुन गप्पा मारत प्रवाशांची वाट पहाणारे रिक्षाचालक सर्वत्र दिसतात. अशा एका रिक्षाचालकाकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. राहुल संजय सोनकडे (वय १९, रा. जयभवानी नगर, पिंपळे गुरव) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक चंद्रकांत भिवा भिसे यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, रिक्षाचालकाकडे गावठी कट्टा आहे. त्यानुसार पोलिसांनी पिंपळे गुरव येथील भैरवनाथनगरमधील जगताप पेट्रोल पंपामागे बुधवारी रात्री साडेसात वाजता सापळा लावून राहुल सोनकडे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे आढळून आली. त्याने हा कट्टा का बाळगला होता, तो त्याने कोठून आणला, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like