पुण्यात रिक्षाचालकाकडून पिस्तूल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

दत्तवाडी पोलीसांनी एका रिक्षा चालकाकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई दत्तवाडी पोलिसांनी म्हसोबा चौकाजवळील गणपती मंदिराजवळ केली.

संतोष राजू शेंडगे (वय २९, रा. घर क्रमांक ४२४, मनपा शाळेजवळ, दत्तवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d1c1d00f-a9d8-11e8-8909-a540815bd1da’]

पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमिवर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त वाढवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुधीर घोटकुले व पोलीस शिपाई रोहन खैरे यांना खबऱ्यामार्फत शेडगे याची माहिती मिळाली. त्यानुसार, तपास पथकाचे उपनिरीक्षक अनिल डफळ, तानाजी निकम, सुधीर घोटकुले, रोहन खैरे, गाढवे, सागर सुतकर यांनी म्हसोबा चौकात सापळा लावला. शेडगे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेण्यात आली. अंगझडती दरम्यान त्याच्या जवळ एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस सापडले. पोलिसांनी त्याच्याकडून २५ हजार २०० रुपयांचे एक पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस जप्त केले. पुढील तपास पोलीस नाईक सोमेश्वर यादव करीत आहेत.

शिवरायांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमचा ‘त्या’ मिरवणूकीत सहभाग