पिंपरी : दोन गावठी पिस्तूल, तिन जीवंत काडतुसे जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  – बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल व राऊंड बाळगणार्‍या एकाला हिंजवडी पोलिसांनी तर दुसऱ्याला खंडणी, दरोडा विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली.

हिंजवडी पोलिसांनी सागर जानकिप्रसाद साहू (28, रा. लिंकरोड, चिंचवड) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विवेक रमेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. एक तरुण हिंजवडीतील राजयोग हॉटेल समोर थांबला असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल, एक राऊंड असल्याची माहिती गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारे, अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिरुध्द गिजे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून ही करवाई केली.

खंडणी, दरोडा विरोधी पथकाने सागर साहेबराव शेवते (30, रा. घरकुल चिखली) याला अटक करुन एक गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. भोसरी गावठाण येथे एक सराइत गुन्हेगार येणार असल्याची माहिती पोलिस किरण काटकर यांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विट्ठल बढे यांच्या पथकाने सापळा रचून सागर याला अटक केली.

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा
‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा
‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर
अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like