Pitru Paksha 2021 | उद्यापासून श्राद्धपक्ष सुरू होईल, 16 दिवसापर्यंत चुकूनही करू नका ‘ही’ कामे; जाणून घ्या

नवी दिल्ली : Pitru Paksha 2021 | पौराणिक ग्रंथांमध्ये म्हटले आहे की, देवपूजापूर्वी जातकाने आपल्या पूर्वर्जांची पूजा केली पाहिजे. पितृ प्रसन्न झाल्यानंतर देवसुद्धा प्रसन्न होतात. याच कारणामुळे भारतीय संस्कृतीमध्ये जिवंत असतानाही घरातील ज्येष्ठांचा सन्मान आणि मृत्यूनंतर श्राद्ध कार्य केली जातात. यापाठीमागे अशी श्रद्धा आहे की, विधीनुसार पितरांना तर्पण (Pitru Paksha 2021) केले नाही तर त्यांना मुक्ती मिळत नाही आणि त्यांचा आत्मा मृत्युलोकांत भटकत राहतो.

पितृपक्ष (Pitru Paksha 2021) साजरा करण्याचे ज्योतिष कारण सुद्धा आहे. ज्योतिषशास्त्रात पितृदोष खुप महत्वाचा मानला जातो. जेव्हा जातक यशाच्या अतिशय जवळ पोहचून सुद्धा यशापासून वंचित राहतो, संतती प्राप्तीमध्ये समस्या येतात, धनहानी होते, अशावेळी पितृदोषाने पीडित असल्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात वर्तवते. यासाठी पितृदोषातून मुक्तीसाठी सुद्धा पितरांची शांती आवश्यक मानली जाते.

पितृपक्षात लक्षात ठेवा या गोष्टी

या 16 दिवसांच्या कालावधीत सर्व पूर्वज कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. ही अनुष्ठाने करणे यासाठी महत्वाचे आहे कारण यामुळे एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांना त्यांचे त्रास ओलांडण्यास मदत मिळते.

तर जे लोक आपल्या पूर्वजांचे पिंडदान करत नाहीत त्यांना पितृऋण आणि पितृदोष सहन करावा लागतो. यासाठी श्राद्धपक्षात तुम्ही पितरांचे श्राद्ध करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात :

– शास्त्रानुसार, मोठा मुलगा आणि सर्वात लहान मुलास श्राद्ध करण्याचा अधिकार आहे, याशिवाय विशेष परिस्थितीत कोणत्याही मुलाला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे.

– पितरांचे श्राद्ध करण्यापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र धारण करा. कुश गवताची अंगठी घाला. याचा वापर पूर्वजांना आवाहन करण्यासाठी केला जातो.

– पिंडदानाचा एक भाग म्हणून जवाचे पीठ, तिळ आणि भाताने बनवलेले गोलाकार पिंड अर्पण करा.

– शास्त्रात अशी श्रद्धा आहे की, श्राद्ध कर्मात पूर्ण श्रद्धेने दान करावे, सोबत एखाद्या गरीबाला, गरजूला सुद्धा मदत करा, याचे पुण्य मिळते. सोबतच गाय, कुत्रा, कावळा इत्यादी पशु-पक्षांसाठी भोजनाचा अंश आवश्य टाका.

श्राद्धपक्षात ही कामे करू नका

– शास्त्रानुसार पितृपक्षाच्या दिवसांमध्ये कोणतेही शुभकार्य करू नये.

– या दरम्यान कोणतेही वाहन किंवा नवीन सामान खरेदी करू नये.

– तसेच, मांसाहारी भोजन अजिबात करू नये. श्राद्ध कार्यात जानवे घालतात तर पिंडदान दरम्यान ते डाव्याऐवजी उजव्या खांद्यावर ठेवतात.

– श्राद्ध कर्मकांड करणार्‍या व्यक्तीने नखे कापू नयेत. याशिवाय त्याने दाढी किंवा केस कापू नयेत.

– तंबाखू, धूम्रपान सिगारेट किंवा दारूचे सेवन करू नका. वाईट कर्म करू नका. यामुळे श्राद्ध कर्म करण्याचे फलदायक परिणाम बाधित होतात.

– शक्य असेल तर सर्व 16 दिवसांसाठी घरात चप्पल घालू नका.

– अशी श्रद्धा आहे की, पितृ पक्षाच्या पंधरवड्यात पितृ कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या घरी येतात. यासाठी, या पंधरवड्यात कोणत्याही पशु किंवा मनुष्याचा अनादर करू नये. उलट, दारात येणार्‍या कोणत्याही प्राण्याला भोजन द्या आणि आदर सत्कार करा.

– पितृपक्षात श्राद्ध करणार्‍या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे सक्तीने पालन केले पाहिजे.

– पितृपक्षात काही गोष्टी खाण्यास मनाई आहे, जसे की – चने, डाळ, जीरे, काळे मीठ, दुधी भोपळा आणि काकडी, सरसो का साग इत्यादी खाऊ नये.

– अनुष्ठानासाठी लोखंडाच्या भांड्याचा वापर करू नये. त्याऐवजी आपल्या पूर्वजांना खुश करण्यासाठी सोने, चांदी, तांबे किंवा पितळेच्या भांड्याचा वापर करा.

– जर एखाद्या विशेष ठिकाणी श्राद्धकार्य केले तर ते विशेष फळ देते.
प्रयाग, बद्रीनाथमध्ये श्राद्ध करण्याने पितरांना मोक्ष मिळतो.
जे एखाद्या कारणामुळे या पवित्र ठिकाणी श्राद्धकार्य करू शकत नाहीत ते आपल्या घराच्या आंगणात
कोणत्याही पवित्र ठिकाणी तर्पण आणि पिंडदान करू शकतात.

– श्राद्धकार्यासाठी काळेतिळ वापरावे.

– पिंडदान करताना तुळस आवश्य ठेवा.

– श्राद्धकार्य, सायंकाळी, रात्री, सकाळी किंवा या अंधारात करू नये.

– पितृपक्षात गाय, कुत्रा, मुंग्या आणि भोजन द्या.

– अशाप्रकारे विविवत श्राद्धपूजा करून जातक पितृ ऋणातून मुक्ती मिळवू शकतात.
श्राद्ध पक्षात केलेल्या श्राद्धाने पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या, कुटुंंबाला जीवनात सुखी, समृद्ध होण्याचा आशीर्वाद देतात.

हे देखील वाचा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pitru Paksha 2021 | shradh 2021 start end date kab se hai shradh dont forget to do these things for 16 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update