तब्बल 20 वर्षानंतर शुभ योगात संपणार पितृपक्ष, करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पितृपक्षाचे दिवस आहे त्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर असणार आहे. या दिवशी अमावस्या असेल, ज्याला सर्वपितृ अमावस्या असे म्हणले जाते. पितृपक्षाचा आरंभ पूर्णिमेच्या दिवशी होतो आणि अंत अमावस्येला, याचा अंतिम दिवस खूपच शुभ मानला जातो.

यंदा पितृपक्ष आणि शनिवार असा संयोग आला आहे. हा संयोग 20 वर्षानंतर आला आहे या आधी असा योग 1999 साली आला होता. शनि आणि अमावस्येच्या शुभ संयोगामुळे 28 सप्टेंबर शनि अमावस्येचे महत्व आणखी वाढणार आहे. यावेळी तुम्ही घातलेले पित्र तुमच्यासाठी आणि कुटूंबासाठी शुभ असतात.

पितृपक्षाचा अंतिम दिवस आणि शनि अमावस्येच्या शुभ संयोगमध्ये गरिबांना, गरजूंची सेवा केल्याने कर्मदाता देवता शनि प्रसन्न होईल. याशिवाय या दिवशी पित्र घातल्याने चांगला आशिर्वाद मिळेल.

हे आहेत उपाय –
या योगाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी काळे तीळ, उडीद, गुळ, वस्त्र इत्यादी पित्रांच्या आठवणीत एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा.

पितृपक्षाच्या अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करा. असे मानले जाते की पितृ पक्षाच्या दरम्यान पिंपळाच्या झाडावर पित्र निवास करतात. श्राद्धाच्या अंतिम दिवशी पिंपळाच्या पानावर पाणी शिंपडा आणि पाच प्रकारचे गोड पदार्थ ठेवा.

श्राद्धाच्या अंतिम दिवशी मुंग्या, गाय, श्वान यांना जेवण खायला घाला. यामुळे पित्रांना तृप्ती मिळेल आणि त्यानंतर ते परलोकात परत जातात.

Visit : Policenama.com