‘या’ 7 ठिकाणी ‘पितृ’पक्षात श्राद्ध घातल्यास मिळतं अधिक ‘पुण्य’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – समाजात जन्म आणि मृत्यू बाबत वेगवेगळ्या धारणा आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं श्राद्ध करण्याची पद्धत पाहायला मिळते. पितृ, देवता आणि पूर्वजांच्या निम्मिताने श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार पिंडदान केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. पिंडदान केल्यामुळे पूर्वजांना मुक्ती मिळते असे मानले जाते. पिंडदान देशातील विविध ठिकाणी केले जाते. अशीच काही ठिकाणे ज्या ठिकाणी जाऊन पिंडदान केल्यामुळे अधिक पुण्य मिळते तसेच मृतात्म्यास शांती मिळते.

जाणून घेऊयात अशीच काही ठिकाणे जेथे पिंडदान केले जाते.
हरिद्वार –
हरिद्वार हे एक धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. येथील शिलावर श्राद्ध अर्पण केल्याने पित्रांना मोक्ष मिळतो. याबाबतचा उल्लेख पुराणामध्ये देखील पाहायला मिळतो. सबंध देशभरातील श्रद्धाळू लोक या ठिकाणी येतात आणि आपल्या पूर्वजांना शांती मिळावी म्हणून येथे पूजा- अर्चना करत असल्याचे पाहायला मिळते.

वाराणसी –
देवादी देव महादेव यांची पवित्र नगरी म्हणून ओळखले जाते. खूप दूरहून लोक इथं येतात आणि आपल्या पूर्वजांचे पिंडदान करत असतात. तसेच वाराणसीच्या काही घाटांवर देखील अस्थी विसर्जन केले जाते. तेथे सुद्धा श्राद्ध चे विधी होत असतात.

बद्रीनाथ –
भारतात चारधामचे विशेष महत्व आहे. चारधाम पैकी एक असणारे बद्रीनाथ हे श्राद्धाच्या विधी पूजेकरिता खूप महत्त्वाचे मानले जाते. बद्रीनाथच्या ब्रम्हकपाल घाटावर श्रद्धा असणारे अनेक जण मोठ्या संख्येने येथे पिंडदान करण्यासाठी येत असतात.

गया –
गया या ठिकाणाला विष्णू या देवाचे ठिकाण मानले जाते. तसेच गया या शहराची मोक्षभूमी अशी सुद्धा ओळख आहे. अनके श्रद्धाळू बिहार मधील गया या ठिकाणी जाऊन पिंडदान करतात. येथे पिंडदान करणे अतिशय महत्वाचे मानले जाते. या ठिकाणी भगवान श्रीराम आणि देवी सीता यांनी राजा दशरथ यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून गया येथे जाऊन पिंडदान केले होते.

जगन्नाथ पुरी –
चारधाम यात्रेपैकी जगन्नाथ पुरीची यात्रा केल्याने मनुष्याला खूप पुण्य मिळते अशी धारणा आहे. या ठिकाणी पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पूजा-पाठ केले जातात. पुरी या शहरात पिंडदान करण्याला एक वेगळेच महत्व असल्याचे मानले जाते.

अलाहाबाद –
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील संगमावर पिंडदान करणे सर्वोत्तम मानले जाते. तसेच या ठिकाणी पिंडदान करण्याचे एक वेगवेगळे महत्त्व आहे. येथील पितृपक्षात या ठिकाणी मोठी जत्रा भरवण्यात येत असते.

मथुरा –
भगवान श्री कृष्णाचा जन्म मथुरेत झाला असल्यामुळे मथुरेचे विशेष महत्व आहे. मथुरेत भगवान श्री कृष्णांचे अनेक धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. पण या ठिकाणी पिंडदान करून त्यांना मोक्ष प्राप्त करून प्रसन्न केले जाते. यासाठी या ठिकाणाचे विशेष महत्व आहे.

Visit – policenama.com 

You might also like