Piyush Goyal | रेलवेमंत्री पदावरून पायउतार झालेल्या पियूष गोयल यांच्यावर भाजपानं सोपवली मोठी जबाबदारी, दिलं प्रमोशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वीच मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात (modi cabinet expansion) भाजपा (BJP) नेतृत्वाने मोठे फेरबदल केले. यामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तर काहींच्या खात्याची आदलाबदल करण्यात आली. यामध्ये महत्वाचे रेल्वेमंत्रीपद पियूष गोयल (Piyush Goyal ) यांच्याकडून काढून घेऊन अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्याकडे देण्यात आले. सध्या गोयल (Piyush Goyal ) यांच्याकडे वाणिज्य तसेच टेक्स्टाइल मंत्रालयाचा कार्यभार आहे. मात्र, आता भाजपाने पियूष गोयल यांच्याकडे आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे.

2010 पासून राज्यसभेचे सदस्य असलेल्या पियूष गोयल यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथम हे पद दिवंगत अरुण जेटली यांच्याकडे आणि नंतर थावरचंद गहलोत यांच्याकडे देण्यात आले होते. आता या पदाची जबाबदारी भाजपाने गोयल यांच्याकडे आली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय
भाजपाने पावसाळी अधिवेशनापूर्वी हा महत्वाचा निर्णय घेत गोयल यांच्याकडे सभागृह नेतेपद सोपवले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत होणार आहे. 26 दिवसांचे पावसाळी अधिवेशन सुट्ट्या वगळता अवघे 13 दिवस प्रत्यक्ष चालेल.

संसदेचे पावसाळी अधिवेशन कोरोना संकट, लसीकरण, इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी, राफेल, अर्थव्यवस्था, जीएसटी यांसारख्या मुद्द्यांवर गाजणार आहे.
या महत्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.
दरम्यान लोकसभा नेतेपदी अधीर रंजन चौधरी यांच्या ठिकाणी राहुल गांधी यांची नियुक्ती काँग्रेस (Congress) करू शकते, अशीही चर्चा आहे.

Web Titel :- piyush goyal appointed leader house rajya sabha replacing thaawarchand gehlot

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh | पुण्यात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल; म्हणाल्या…

Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ