धावत – पळत संसदेत पोहचले मंत्री पियुष गोयल ! नेटकरी म्हणतात – ‘ट्रेन मिस झाली का’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे संसदेत प्रश्न उत्तरांचा ‘सिलसिला’ देखील सुरु आहे. बुधवारी घडलेल्या एका प्रकारामुळे सोशल मीडियावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल गाडीतून उतरतात आणि धावत पळत जाऊन लोकसभेत पोहचण्याचा प्रयत्न करतात आणि आजूबाजूला उभे असलेले लोक हे पाहून मजा घेत आहेत.

मात्र या प्रकारामुळे सोशल मीडियावर कमेंटला उधाण आले आहे. गुजरातचे खासदार प्रभू वसाला यांनी पियुष गोयल यांचे यासंबंधीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्याला त्यांनी कॅप्शन दिले आहे, ‘नवभारताचे उर्जावान मंत्री आदरणीय पियुष गोयजी कॅबिनेट मिटींगच्या समाप्ती नंतर धावत पळत संसदेत पोहचले जेणेकरून प्रश्न उत्तराला वेळ होऊ नये.

सोशल मीडियावर काही लोक याचे कौतुक करत आहेत तर काही त्यांना ट्रोल करत आहेत. पृथ्वीराज म्हणतात, “हजेरी लावण्यासाठी पळत आहेत पियुष गोयल.”

या व्यतिरिक्त किरण नावाजे युजर लिहितात, रेल्वेच्या कमाई वरील प्रश्नांपासून पळत आहेत पियुष गोयल, तर काहींनी गोयल यांचा उल्लेख २x गोयल म्हणून देखील केला आहे. जेव्हा तुम्हाला समजते की जेवणासाठी बिर्याणी आहे आणि तुम्ही पळत सुटता अशा प्रकारचे कॅप्शन देखील काहींनी दिले आहे.

बुधवारी कॅबिनेटची एक बैठक झाली होती, ज्यामध्ये सर्व मंत्र्यांनी सहभाग दर्शवला होता. बुधवारीच प्रश्न-उत्तराच्या दरम्यान रेल्वेशी संबंधित अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले. लोकसभेतील प्रश्नांची उत्तरे देताना पियुष गोयल यांनी रेल्वे मधील एफडीआयचा आकडा सांगितला.

Visit : policenama.com