पियूष गोयल यांची मोठी घोषणा ! रेल्वेत ५०% पदांवर महिलांची भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने महिलांच्या भरतीसंबंधित एक आनंददायी बातमी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली आहे की रेल्वेमध्ये असलेल्या ९,००० पेक्षा आधिक कॉस्टेबल आणि सब- इंस्पेक्टर या पदांची भरतीमध्ये महिलांना ५० टक्के पद आरक्षित असतील. म्हणजेच ५० टक्के पदावर फक्त महिलांना भरती करुन घेतले जाईल. त्यामुळे रेल्वेकडून करण्यात येणारी ही भरती महिलांसाठी खूपच मोठी संधी असणार आहे.

जानेवारी २०१९ मध्ये, भारतीय रेल्वेने २०२१ पर्यंत १० टक्के आरक्षणाअंतर्गत ४ लाखापेक्षा अधिक लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. ज्यात सांगण्यात आले होते की भरती प्रक्रिया लवकर सुरु होईल.

पीयुष गोयल यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेमध्ये १५.०६ लाख कर्मचारी आहेत, ज्यात १२.२३ लाख कर्मचारी कार्यरत आहेत तर बाकी २.८२ लाख पदे रिकामी आहेत.

दोन वर्षात जवळपास ९९ हजार पदे रिक्त –
पीयूष गोयल यांनी सांगितले की, मागील वर्षी आम्ही १.५१ लाख पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती. ज्यात १.३१ लाख पदे रिक्त राहिली होती. याच बरोबर पुढील दोन वर्षात जवळपास ९९ हजार पदे रिक्त होती. कारण सध्या काम करणारे रेल्वे कर्मचारी रिटायर होणार आहेत.

दोन वर्षात रेल्वे भर्ती करुन घेणार २.३ लाख पदे –
रेल्वे मंत्र्यांनी जानेवारी मध्ये घोषणा केली होती की, २.३ लाख पदासाठी पुढील २ वर्षात भरती प्रक्रिया पुर्ण केली जाईल. १.३१ लाख पदाच्या नव्या भरतीच्या पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी – मार्च, २०१९ मध्ये सरकारच्या आरक्षणाच्या नीतिनुसार सुरु करण्यात येईल. ज्यात अनुसूचित जाती, जमाती यासाठी उमेदवारी आरक्षित करण्यात येईल.

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव