सावधान ! पिझ्झा, मॅगी आणि चिप्स खाण्यापुर्वी ‘हे’ नक्की वाचा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या आपण फिट राहण्यासाठी व्यायाम, योगा असे वेगवेगळे कसरतीचे प्रयोग करून स्वतःला स्वस्थ ठेवण्यासाठी कटिबद्ध असतो. परंतू असे असले तरी जंकफूड पासून स्वतःला दूर करणे सगळ्यांनाच जमत नाही. आणि फिट राहायचं असेल तर पिझ्जा, बर्गर, मॅगी अशा जंक फूडपासून लांब राहा, असे डॉक्टर्स आणि जाणकार मंडळींपासून नेहमी सांगितले जाते. परंतु पिझ्झा, बर्गर, मॅगी असे फास्टफूड खाण्याचा मोह हा आवरला जात नाही. असे खाद्यपदार्थ खायला जर तुम्हाला आवडत असेल तर हरकत नाही परंतु यामध्ये कोणकोणते घटक आहेत याची सर्वांना माहिती व्हावी यासाठी एक संशोधन करण्यात आले आहे.

सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंटने केलेल्या चाचण्यांमध्ये असे निदर्शनास आले की विविध जंकफूड आणि चिप्स सारखे खारे पदार्थ यांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. जंक फूडमध्ये सरकारने घालून दिलेल्या नियमांपेक्षाही अति प्रमाणात घटक असतात. या पासून वाचण्यासाठी जंक फूडवर एक वैधानिक इशारा असायला हवा. या पदार्थात मीठ आणि फॅट्सचं प्रमाण जास्त आहे हे त्यांनी नमूद करायला हवं. असे सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंटच्या प्रमुख सुनीता नारायण यांनी सांगितले.

तसेच सुनीता नारायण यांनी जंकफूड बाबत इशारा दिला की, जंक फूडमध्ये ट्रान्सफॅटचं प्रमाण जास्त प्रमाणात असते. ट्रान्सफॅट हे काही वेळा मोनो सॅच्युरेटेड किंवा पॉलिसॅच्युरेटेड असू शकतात; पण ते कधीही सॅच्युरेटेड असत नाहीत. ट्रान्सफॅटचा अर्थ मेद असा होतो. आणि ज्या पदार्थात नैसर्गिकरीत्या मेद असतो, त्याचे शरीरावर फारसे घातक परिणाम होत नाहीत. तसेच ते म्हणाले की ट्रान्सफॅटमुळे हृदयविकार होण्याचा धोका जास्त असतो म्हणून त्यापासून लांब राहिलेलेच योग्य. अशारितीने सुनीता नारायण यांनी फास्टफूड संबंधी योग्य तो सल्ला दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/