Pizza Burger | पिझ्झा-बर्गरची असेल आवड तर बिघडू शकते पचन, या 4 घरगुती उपायांनी ठिक करा पचनक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pizza Burger | हिवाळ्यात गरमागरम समोसे, पिझ्झा, बर्गर, टिक्की आणि इतर तळलेले पदार्थ पचनक्रियेवर परिणाम करतात. जेवताना हे लक्षात येत नाही, पण नंतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत, सकाळी पोट साफ करणे कठीण होते. (Pizza Burger)

 

पोट साफ न होण्याला बद्धकोष्ठतेची समस्या देखील म्हणतात, जी काही प्रकरणांमध्ये शरीरासाठी वेदनादायक ठरते. बद्धकोष्ठता आणि पोट साफ न झाल्यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार उद्भवू लागतात.

 

यापासून सुटका मिळण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रोडक्ट्सचा अवलंब करतात. पण पचनक्रिया मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपायदेखील करू शकता, ज्यामुळे सकाळी पोट साफ होऊ शकते. जाणून घेऊया हे घरगुती उपाय – (Pizza Burger)

 

1. लिंबू-मध ड्रिंक :
जर पोटात जडपणा जाणवत असेल आणि सकाळी पोट साफ होण्यास त्रास होत असेल, तर फक्त सकाळी थोडे मध आणि लिंबू मिसळून कोमट पाणी प्यावे. असे केल्याने पोट स्वच्छ होतेच, शिवाय शौचही सहज होते.

2. फायबरयुक्त आहार :
पोटाची समस्या असल्यास आहारात फायबरयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करावे. याशिवाय फायबरने युक्त किमान एक किंवा दोन फळे रोज खावीत. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होते. यासाठी पपई हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

 

3. भरपूर सॅलड सेवन करा :
सॅलडला जेवणात सर्वाधिक महत्त्व आहे. पोटाच्या समस्येमध्ये सॅलड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
रोजच्या जेवणासोबत भरपूर सॅलड खाल्ल्यास सकाळी या समस्येपासून बर्‍यापैकी सुटका होऊ शकते.

 

4. गूळ आणि बडीशेप :
शौचाला साफ होत नसल्यास रात्री जेवणानंतर गूळ आणि बडीशेप खाण्यास विसरू नका.
गूळ- बडीशेप जेवणानंतर सेवन करा. यामुळे पोटात गॅस तयार होत नाही. सकाळी पोट साफ होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Pizza Burger | pizza burger fanatics can spoil your digestion fix your digestive system with these home remedies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Garlic | तुम्हाला लसून खुपच आवडतो का? तर व्हा सावध! अति सेवन केल्याने लिव्हरचे होऊ शकते नुकसान

Andheri Bypoll | शिवसेनेचे टेन्शन वाढले! ‘या’ उमेदवाराची अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची आयोगाकडे केली मागणी

Naresh Mhaske | ‘ठाकरेंकडे जेव्हा सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काही केले नाही’ – नरेश मस्के