इम्रान खानविरोधात पाकिस्तानमध्ये वादळ, सर्वांची नजर लष्कराकडे

इस्लामाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –   पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार आणि लष्कराच्याविरूद्ध विरोधी पक्षांची एकजुट झाली आहे. शुक्रवारी झालेल्या राजकीय दलाच्या आवाहनावर इम्रान खान सरकारच्या विरोधात हजारो संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. इम्रान खान यांच्या विरोधकांनी यास इम्रान खान यांच्या अंताची सुरूवात म्हटले आहे.

पाकिस्तानची सर्वात मोठी धार्मिक पार्टी आणि सुन्नी कट्टरपंथी दल जमीअत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआई-एफ) चे चीफ मौलाना फजलुर रहमान यांनी म्हटले की, हे अवैध सरकार आहे. हे सिस्टमने आमच्यावर थोपवले आहे. आम्ही हे अवैध सरकार नाकारतो. मौलाना यांनी यापूर्वीही इम्रान खान सरकारच्या विरोधात स्वातंत्र्य मार्च काढला होता.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्करावर, आपले सरकार पाडले आणि 2018 च्या निवडणुकीत इम्रान खानला सत्तेत बसवल्याचा आरोप केला. लंडनवरून नवाझ शरीफ यांनी आपल्या व्हर्च्युअल संबोधनात म्हटले, बेरोजगारी, महागाई या संकटासाठी मी इम्रान खान यांना दोषी ठरवतो किंवा त्यांना ज्यांनी सत्तेत आणले ते यास जबाबदार आहेत. तुमचे मत कुणी चोरले आणि निवडणुकीत गडबड कुणी केली? कुणी हे सरकार निवडले आहे?

नवाज शरीफ यांनी म्हटले, त्यांनी माझे बोलणे रोखले, जेणेकरून माझा आवाज दबला जावा आणि तुमच्यापर्यंत पोहचू नये. तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहचू नये…परंतु त्यांना यश आले नाही. नवाज शरीफ यांनी ‘वन पाकिस्तान फॉर ऑल‘ ची घोषणा दिली आणि लष्करी अधिकार्‍यांसाठी शिक्षेची मागी केली. नवाज शरीफ यांनी म्हटले की, लष्करानेच इम्रान खान यांना सत्तेत बसवले आणि संविधानाचे उल्लंघन केले. पण जेव्हा मी संविधान आणि लोकशाही बाबत बोलतो तेव्हा मला देशद्रोही ठरवले जाते.

या रॅलीच्या अगोदरच मोठ्या प्रमाणात लोकांना अटक करण्यात आली. विरोधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनाही जेलमध्ये टाकण्यात आले. यापैकी बहुतांश पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) पार्टीचेच लोक होते. रॅलीनंतर सुद्धा अटकसत्र सुरूच होते. नवाज शरीफ यांची मुलगी मरयम नवाज यांचे पती सफदर अवान यांनाही अटक करण्यात आली आहे.

पीएमएल-एनचे सेक्रटरी जनरल एहसान इक्बाल यांनी सांगितले की, निदर्शनांच्या अगोदरच पोलीस कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये घुसले आणि बनावट प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली.

इक्बाल यांनी सांगितले की, मागील तीन दशकात राजकीय अनुभवांच्या दरम्यान मी मार्शल लॉ लागू होताना पाहिला आहे, परंतु अशाप्रकारची क्रुरता कधीही पाहिली नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या विराधात अजूनही छापेमारी सुरू आहे. त्यांनी आमच्या रस्त्यात कंटेनर ठेवले आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे आणि आमचे बॅनर्स फाडले आहेत, परंतु आम्ही थांबणार नाही. ही इम्रान खानच्या युगाच्या अंताची सुरूवात आहे.

इम्रान खानला सत्तेच्या बाहेर काढण्यासाठी पीडीएम अलायन्स (पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट) मागच्या महिन्यातच बनवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात हे पहिली वेळ आहे, जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराला आव्हान देत आहेत. नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एनसह पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि जमायत-उलेमा-ए-इस्लाम फजल, जेयूआई-एफ, या लढाईचे नेतृत्व करत आहे.

पाटीच्या नेत्यांचा आरोप आहे की, पाकिस्तानचे लष्कर आपल्या अमर्याद ताकदीचा वापर राजकारणात दखल देण्यासाठी करत आहे. पाकिस्तानच्या लष्करावर हा सुद्धा आरोप केला जात आहे की, 2018 च्या निवडणुकांमध्ये गडबड केली आहे आणि इम्रान खानला जिंकवले आहे. इम्रान खान यांच्या सरकारला विरोधी पक्षाचे नेते लष्कराची कठपुतळी म्हणून देखील संबोधतात.

इक्बाल यांनी म्हटले, आम्हाला राजकारणात लष्कराच्या हस्तक्षेपाची गरज नाही, हे थांबले पाहिजे. यासाठी सर्व राजकीय पक्ष आज एकत्र आले आहेत. पाकिस्तानसाठी केवळ एकच मार्ग आहे की, त्याने लष्कराच्या हस्तक्षेपाशिवाय लोकशाहीसोबत पुढे जावे, विरोधी पक्षांची आघाडी आगामी आठवड्यांमध्ये अशा अनेक रॅली काढणार आहे. जानेवारी 2021 मध्ये इम्रान खान यांच्याकडे राजीमान्याची मागणी करत राजधानी इस्लामाबादपासून संसदेपर्यंत एक महारॅलीचे आयोजन केले जाणार आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे म्हणे आहे की, ते मोठ्या प्रमाणात राजीनामा देतील आणि संसदेत सरकारविरोधात अविश्वासचा ठराव आणतील.

इम्रान खान यांच्या सरकारविरोधात अशावेळी आंदोलने होत आहे, जेव्हा बेरोजगारी, महागाई दर आणि कमजोर अर्थव्यवस्थेने सरकार बेजार झाले आहे. खाद्याच्या किंमती प्रचंड वाढल्याने लोकांच्या मनात इम्रान सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. कोरोना महामारीमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुद्धा वाईट पद्धतीने प्रभावित झाली आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरस जवळपास नियंत्रणात आहे. येथे आतापर्यंत कोरोना संसर्गाची 3 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे झाली असून 6621 मृत्यू झाले आहेत. पाकिस्तानची एकुण लोकसंख्या 22 कोटी आहे. शुक्रवारी झालेल्या रॅलीमध्ये सुमारे 50,000 लोक स्टेडियममध्ये जमले होते. येथे कोरोनाचे कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत.

गर्दीच्या हातात नवाज शरीफ आणि बेनझीर भुत्तो यांचे बॅनर्स होते. रावळपिंडीत राहणार्‍या वसीम अहमद खान याने सांगितले की, आम्हाला एक लोकशाही पाकिस्तान हवे आहे, जेथे प्रत्येकाला उत्तर द्यावे लागेल. जेव्हापासून इम्रान खान सत्तेत आले आहेत, लोकांचा महिन्याचा खर्च दुप्पट झाला आहे. कुटुंबाचे पोट भरणे अवघड झाले आहे.

लियाकत अली कुरेशी यांनी म्हटले, सरकार गरीबावर अत्याचार करत आहे. आम्ही आमच्या जुन्या पाकिस्तानमध्ये खुश होतो, हेच इम्रान खान यांचे नवीन पाकिस्तान आहे काय? जाहीर आहे की जर हेच नवीन पाकिस्तान आहे, तर गरिबांसाठी हे नाही. प्रत्येकाला माहित आहे की, इम्रान खान यांना त्याच लोकांनी पंतप्रधान बनवले होते जे सात दशकापासून पकिस्तानचे राजकारण नियंत्रित करत आहेत, म्हणजे पाकिस्तानचे लष्कर.

जस-जसा इम्रान खान सरकारवर दबाव वाढत चालला आहे, तस-तसे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे अटकसत्र सुद्धा वाढले आहे. मागच्या महिन्यात पीएमेल-एनचे नेते आणि नवाज शरीफ यांचे भाऊ शहबाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक करण्यात आली होती. तर, नवाज शरीफ यांना मागच्या वर्षी ब्रिटनमध्ये आठ आठवड्याच्या उपचारांसाठी जामीन मिळाला होता, परंतु आता त्यांना कोर्टाने फरार म्हटले आहे. पाकिस्तानचे सरकार ब्रिटनकडे त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्याविरोधात सुद्धा याच आठवड्यात एक अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आले होते. आता पहावे लागेल की, पाकिस्तानचे लष्कर इम्रान सरकार आणि स्वत:ला वाचवण्यासाठी कोणते पाऊल उचलते.