पाकिस्तानला गेल्या ८ वर्षातील सर्वात मोठा झटका, ‘या’ कंपन्यानीं साथ सोडली

इलाहाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरतच आहे. त्यात आता पाकिस्तानमधील सामान्य जनतेसाठी वाईट न्यूज आली आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार ऑटो सेक्टर सध्या अडचणीत आली आहे. पाकिस्तानमधील सर्व मोठ्या कंपन्यांनी गाड्यांचे प्रोडक्शन थांबवले आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील सामान्य माणसावर अधिकचा भार येणार आहे. कारण सामान्य माणूस दोन्ही कडून भरडला जात आहे. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेरोजगारी अशी दोन्ही बाजूंनी संटक आले आहे. तिथंच पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी व्याज दर १३.२५ टक्के केला आहे. गेल्या ८ वर्षातील सर्वाधिक व्याज दर आहे. त्याचा हा सर्व परिणाम आहे.

तज्ञांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने व्याज दर वाढवल्याने त्याचा परिणाम सामान्य जनतेसह कंपनीवरही पडणार आहे. त्यामुळे या कंपन्यांना मोठ्या कर्जांवर मोठा व्याजदर चुकवावा लागणार आहे. त्याचा सरळ परिणाम हा कंपनीच्या बॅलेंसशीटवर होणार आहे. तरी कंपनी कॉस्ट कटिंगबद्दल विचार करून शकते.

होंडा अॅटलस कार पाकिस्तान (एचएसीपी)ने सांगितले, की त्यांचे प्लांट शुक्रवारपासून १० दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे गाड्यांचे उत्पादन करण्यात काही अर्थ नाही. अजूनही २ हजार गाड्या सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

तसंच पाकिस्तानमधील टोयडा मॉडेलची कार बनवणाऱ्याही कंपमीने पुढेचे आठ दिवस उत्पादन रोकले आहे. तसंच आठवड्यातील दोन दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन उत्पादनाचे काम रोखले जाते. तर सुजुकी मोटर कंपनीच्या प्रवक्त्यांनीही उत्पादन थांबवण्यावर आपली प्रतिक्रिया दिला. कंपनी उत्पादन थांबवण्याच्या मुद्द्यावर विचार करून लवकरच निर्णय घेईल. तेही या महिन्यात होणाऱ्या विक्री आणि बुकिंगवर अवलंबून असेल.

दरम्यान, पाकिस्ताची चहुबाजूने कोंडी झाली आहे. पाकिस्तानमध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच अर्थिक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पाकिस्तानी सरकार प्रयत्न करत असून आता पर्यंत अपयशी ठरले आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी