अबब ! ‘या’ ठिकाणी दरवर्षी मातीतून निघतं 1 लाख किलो सोनं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात अनेक सोन्याच्या खाणी असून यातून मोठ्या प्रमाणात सोन बाहेर काढले जाते. मात्र यात Nevada Gold Mine सर्वात खास आहे. या सोन्याच्या खाणीतून दरवर्षी लाखो किलो सोने बाहेर काढले जाते. जगातील बहुतेक सोनं इथल्या खाणींमध्ये बाहेर पडले जाते.

नेवाडा हे अमेरिकेतील एक शहर आहे. नेवाड्यात खाणकाम हा सर्वात मोठा उद्योग असून येथे खाणीतून सर्वाधिक सोने काढले जाते. नेवाडा गोल्ड माईनमध्ये दरवर्षी इथे 115 ते 170 टन सोने काढले जाते. म्हणजे जवळपास 1 लाख 70 हजार किलो. सन 2018 मध्ये नेवाडा येथे तब्बल 5, 581, 160 ट्रॉ. औस (173.6 टन) उत्पादन केले होते. अमेरिकेतील एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी 78 टक्के सोन नेवाडा येथे काढले जाते.