स्वातंत्र्यदिन विशेष ! देशभक्ती सोबतच झेंडा वंदन करताना हे नियम सुद्धा माहित असायला हवेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिरंगी झेंडा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक सरकारी ठिकाणी तिरंगी झेंडा फडकवला जातो. येणार ७३ वा स्वातंत्र्य दिवस सुद्धा देशामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहण करून अनेक कार्यक्रम या दिवशी घेतले जातात.

प्रत्येक भारतीयाला तिरंगी झेंड्याचा सन्मान करणे बंधनकारक आहे. त्या संबंधी घटनेमध्ये काही महत्वाचे नियमही दिलेले आहेत आणि प्रत्येकाने ते पाळणे बंधनकारक आहेत.

भारतीय घटनेने आपल्या ध्वजाबद्दल काही नियम ठरवून दिलेले आहेत ते पुढीलप्रमाणे –
१) राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडापासून बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

२) ध्वज फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

३) शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा.

४) राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

५) ध्वज फडकवताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा.

६) केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिना दिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

७) भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण 3:2 असे आहे.

आपला राष्ट्रध्वज देशातील ठराविक ठिकाणीच बनवला जातो. नांदेड मधील ठिकाणाहून आतापर्यंत ८ हजारपेक्षा जास्त ध्वजांची विक्री या स्वातंत्र्यदिनाआधी झालेली आहे. तिरंगी झेंडा हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचे प्रतीक आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like