खुषखबर ! पैसे नसतानाही फिरू शकता विदेशात, ‘या’ बँका करताहेत मदत

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या शाळांना सुट्ट्या लागल्याने प्रत्येकजण कुठेना कुठे बाहेर फिरायला जायचा बेत आखत असतो. काही वेळा फिरायला जायची इच्छा असते मात्र खिशात पैसे नसतात. पण आता काही काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही देश-विदेशात फिरू शकता. तुम्हाला फिरण्यासाठी काही बँका मदत करणार आहेत. फिरून आल्यानंतर हे पैसे तुम्ही EMI ने फेडू शकता.

आपल्या देशात ट्रॅव्हल लोनची लोकप्रियता वाढत आहे. कारण पर्यटनासाठी कर्ज सहज उपलब्ध होत आहे. ट्रॅव्हल लोनसाठी अर्ज केल्यानंतर लगेच तुम्हाला लोन मंजुर करण्यात येते. डिजिटल लेंडिंग प्लॅडिंग फ्लॅटफॉर्म इंडिया लेंड्सनं सादर केलेल्या अहवालानुसार भारतामध्ये सर्वात जास्त तरुण ट्रॅव्हल लोन घेतात.

हे लोन कसे घ्यायचे

ICICI बँक

ICICI बँके कडून तुम्हाला ट्रॅव्हल लोन मिळू शकते. यासाठी तुम्ही कुठे जायचे ते तुम्ही ठरवायचे. ही बँक तुम्हाला फिरण्यासाठी २० लाखापर्यंत कर्ज देऊ शकते. तसेच कर्जासाठी कोणत्याही सिक्युरिटीची गरज लागत नाही. याचा व्याज दर १०.९९ टक्के प्रति वर्ष आहे.पेटीएमकडूनही तुम्हाला ट्रॅव्हल लोन मिळू शकते. यामध्ये ईएमआयवर मिळणारा व्याज दर तुमच्या क्रेडिट कार्डवर अवलंबून आहे. हा व्याज दर १३ ते १७ टक्क्यापर्यंत असू शकतो.

बजाजकडून मिळू शकतं कर्ज

बजाज फिनसर्विस पर्सनल लोनद्वारे तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबाबरोबर देशात किंवा परदेशात सुट्टीवर जाऊ शकता. यासाठी फक्त पाच मिनिटात लोन मंजूर केले जाते. तसचे तुम्हाल तिकीट बुकिंग आणि हॉटेलची सोय देखील करून दिली जाते. बजाज कडून तुम्हाला २५ लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. याचा व्याज दर आहे १२.९९ टक्के.

एक्सिस बँकेचं ट्रॅव्हल लोन

एक्सिस बँकेकडून ५० हजार ते १५ लाखापर्यंत कर्ज मिळू शकत. या बँकेचा व्याज दर १५.५ ते २४ टक्के आहे. ही बँक दोन महिन्यांचा ईएमआय देण्याची सवलत देते. ईएमआय तिसऱ्या महिन्यापासून सुरू होतो.

टाटा कॅपिटल

टाटा कॅपिटल तुमचं पर्यटनाचं ठिकाण निवडण्याबरोबर २५ लाख रुपयापर्यंत कर्ज देते. व्याज दर ११.४९ ते २१ टक्के आहे. याला गॅरंटरची गरज नाही.