अग्निशमन बिनतारी संदेशवहन विभागाचे वृक्षारोपण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आज अग्निशमन दलाच्या बिनतारी संदेशवहन विभागाचे वेताळटेकडी येथील रिपीटर स्टेशनचे आवारात वेताळ महाराज मंदिराशेजारी पर्यावरण रक्षणासाठी वड, पिंपळ, औंदुबर, बेल, कडुलिंब आणि आंबा अशा जंगली प्रजातीतील एकूण २६ वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षप्रेमी धनंजय नाईक व त्यांचे सहकारी यांच्या पुढाकाराने रविवारी सकाळी ही रोपटे लावण्यात आली.

[amazon_link asins=’B00J0WL350′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aaa4627d-8e39-11e8-bb6d-fd30aea9d62b’]

या वृक्षरोपणाचा कार्यक्रमाच्या वेळी वयाची ५४ वर्षे पुर्ण करणारे व वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी सुनिल गिलबिले यांची उपस्थिती महत्वाची होती. तसेच सिनिअर रेडिओ टेक्निशियन वासुदेव एकबोटे व जवान प्रकाश भूमकर, विठ्ठल साळुंके, प्रकाश कांबळे, संजय भावेकर तसेच टेकडीवर सहलीला आलेल्या काही महाविद्यालयीन युवक युवतींचे या कार्यात सहकार्य लाभले.

जाहिरात