दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर महिनाभरात बंदी : पर्यावरण मंत्री रामदास कदम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  महाराष्ट्रात गेल्या वर्षी प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली पण या बंदीतून दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांना सूट देण्यात आली होती परंतु आता महिन्याभरात दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी लागू करण्यात येणार आहे. मात्र दुधाच्या पिशव्या पूर्णपणे बंद करण्यात येणार नाहीत, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली आहे. दुधाची पिशवी घेतल्यानंतर रिकामी पिशवी आणून देणाऱ्या ग्राहकांना ५० पैसे परत देण्याची तयारी कंपन्यांनी दाखविली असल्याची माहितीही कदम यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत उपस्थित केला प्रश्न

राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही दुधाच्या प्लास्टिक पिशव्या सुरू कशा काय? असा प्रश्न काही आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला. त्या प्रश्नाला उत्तर देताना रामदास कदम यांनी ही माहिती दिली. राज्यात दररोज १ कोटी दुधाच्या पिशव्या तयार होतात. त्यातून ३१ टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यामुळेच पुढील महिन्याभरात दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याचं कदम म्हणाले.

प्लास्टिक बंदीनंतर ६०० टन प्लास्टिक कचरा कमी

राज्यात १२०० टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होत होता. मात्र प्लास्टिक बंदीनंतर यातील ६०० टन कचरा कमी झाला, असं त्यांनी सांगितलं. राज्यात १ लाख २० हजार २८६ टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. २४ कंपन्या दिवसाला ५५० टन प्लास्टिकवर प्रक्रिया करतात. सिमेंट कंपन्यांना ३ हजार टन प्लास्टिक वापरायला दिलं असल्याचंही ते म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी “

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे 

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी 

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

सिनेजगत 

अभिनेत्री मल्‍लिका शेरावतचा मोठा ‘गौप्यस्फोट’ ; म्हणाली, ‘तसं न केल्यामुळे गमावले अनेक चित्रपट’

‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीला होतं अश्‍लील व्हिडीओ पाहण्याच ‘व्यसन’