‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी टाकून दिली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय राजधानीच्या बंगाल साहिब गुरुद्वारात गेल्या मंगळवारी प्लास्टिकची डाळ शिजवण्यात आली. लंगरमध्ये डाळ वाढण्याआधीच याची माहिती मिळाली आणि जवळपास 30 किलो डाळ फेकून देण्यात आली.

गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं सांगितलं की, “दोन दिवस डाळ बनवण्यात आली. डाळ बनताच तिचा गाळ होताना दिसत होता. आणि त्यातून प्लास्टिकचा गंध येत होता. हे पाहून पहिल्याच दिवशी डाळ फेकून देण्यात आली. यानंतर पुन्हा हेच निदर्शनास आलं. यानंतर डाळीच्या स्टॉकची तपासणी करण्यात आली.

सीलंबद पाकिटातच धान्य घेणार
या घटनेनंतर गुरुद्वारा प्रशासनानं सर्व गुरुद्वारांना सूचना देण्यात आल्या की, जो किराणा येत आहे त्याची व्यवस्थित तपासणी करून पहावी. जे लोक किराणा किंवा धान्य देत आहे त्यांना अपील करण्यात आलं की, सीलबंद पाकिटातच अन्नधान्य दिलं जावं.

50 ते 60 लोक लंगर करतात
गुरुद्वार बंगला साहिबमध्ये प्रतिदिन 50 ते 60 हजार लोक लंगर करतात. लंगरमध्ये वापरलं जाणारं डाळ-तांदूळ, पीठ, भाजी, राशन साधारणपणे लोकचं दान करतात. यासाठी गुरुद्वारा परिसरातच राशन स्टोर बनवण्यात आलं आहे. ज्याला राशन दान करायचं आहे ते इथे राशन देऊन जातात.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/