कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा येथे पहाटे भंगाराच्या गोडावूनला लागलेल्या आगीत सर्व प्लॉस्टिकचे साहित्य जळून खाक झाले. त्यात एक स्कुल व्हॅन आणि रिक्षा जळून खाक झाला.

तालाब कंपनीपासून काही अंतरावर सोमजी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे एक भंगाराचे गोडावून आहे. शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास या गोडावूनला अचानक आग लागली. ही खबर अग्निशामक दलाला ३ वाजून १५ मिनिटांनी मिळाली. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व २ टँकर तातडीने घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत संपूर्ण गोडावूनने पेट घेतला होता. या गोडावूनला लागूनच एक रिक्षा आणि स्कुल व्हॅन पार्क केली होती. ही दोन्ही वाहने या आगीत भस्मसात झाली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. एक तासामध्ये आग संपूर्णपणे विझविण्यात आली.

हेही वाचा – धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’

आग विझविण्यासाठी तांडेल गणपत पडये, चालक योगेश जगताप, सोपान कांबळे, तेजस खरीवले, अभिजित थाळकर, सौरभ नगरे, प्रदीप कोकरे, विशाल गायकवाड यांचा सहभाग होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us