पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकवणारा प्राध्यापक पोलीसांच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

प्रसिध्द पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकवण्याप्रकरणी एका प्राध्यापकाला आज अटक करण्यात आली. दरम्यान मुंबईतील आंबोली पोलीसांनी आरोपी प्राध्यापकास गुन्हा दाखल करुण त्यास तुरुंगात टाकले.

राजेश कुमार शुक्ला वय ३० असं आरोपीचे नाव असुन, आरोपी प्राध्यापक असल्याचं समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीवरुन, आरोपी राजेश बिहारमधील सासाराम येथिल रहिवासी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. आपल्या आवडीच्या गायकांना भेटण्यासाठी तो मुंबईत आला होता.राजेश कुमार शुक्ला पलक मुच्छलचा चाहता असल्याचं सांगत होता. पलकने आपली भेट घ्यावी, म्हणून तिचा पाठलाग करणं, नजर ठेवणं आणि फोनवरुन धमकी देणं असे सर्व प्रकार त्याने केले.यासाठी टेलिफोन डिरेक्टरीतून गायिका पलकचा नंबर शोधल्याचे राजेशने स्पष्ट केले आहे. तसेत पलकला त्याने भेटण्यासाठी दोन-तीन वेळा मेसेज व फोनही केला होता. यामध्ये आपल्याला न भेटल्यास विनयभंग करण्याची धमकीही आरोपीने दिली होती.

याघटनेची गायिका पलकने आंबोली पोलीसात तक्रार नोंदवली होती. सुरुवातीला तिने राजेशच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष केलं, मात्र हे प्रकार वाढल्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली.पोलिसांनी आरोपी राजेशचा फोन ताब्यात घेतला असून त्याने इतर पार्श्वगायिकांनाही त्रास दिला आहे का, याचा तपास पोलीस घेत आहेत.