6 प्रेग्नंट महिलांना घेऊन मित्राच्या लग्नात पोहाेचला तरुण; सर्व मुलांचा पिता असल्याचा केला दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लग्न सोहळ्यात दरम्यान एक व्यक्ती सहा प्रेग्नंट महिलांसोबत आला आणि त्याने दावा केला की, तो गर्भात वाढत असलेल्या सर्व मुलांचा पिता आहे. प्रीटी माइक नावाच्या व्यक्तीचे फोटोज सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.

प्रीटी माइक नायजेरियाचा राहणारा आहे आणि प्ले बॉय म्हणून फेमस आहे. यापूर्वीसुद्धा अनेकदा तो चर्चेत राहिला आहे. 2017 मध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याने त्याला अटकसुद्धा झाली होती.

प्रीटी माइक अभिनेता मित्र विलियम्स उचेम्बाच्या विवाहात सहा प्रेग्नंट महिलांसोबत आला होता. यामुळे नवरा-नवरीपेक्षा जास्त चर्चा माइकची झाली.

सोशल मीडियावर प्रीटी माइकने लिहिले आहे की, तो सध्या खूप चांगले आयुष्य जगत आहे आणि ही कोणतीही अ‍ॅक्टिंग ट्रिक नाही. इंस्टाग्रामवर अनेक लोकांनी लिहिले आहे की, त्याने नवरा-नवरीची मजा खराब केली, कारण प्रत्येकजण त्यांची चर्चा करू लागला आहे.

प्ले बॉय म्हणून फेमस असलेला हा व्यक्ती नेहमी आपल्या ग्लॅमरस लाइफचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करतो. इंस्टाग्रामवर प्रीटी माइकचे तीन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

You might also like