दिग्गज खेळाडू, कलावंतांचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा

कोथरूड महाराष्ट्राच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. जनताभिमुख विकासाचे पर्व यापुढेही असेच सुरू राहील विश्वास व्यक्त करीत या कलावंत व खेळाडूंनी चंद्रकांत पाटील यांच्या समवेत क्रीडा क्षेत्रासाठीच्या योजनांबाबत सकारात्मक चर्चा केली.

क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार आणि श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एका निवेदनाद्वारे चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामध्ये गौरव नाटकर, नितीन कीर्तने, संदीप कीर्तने, अभिजीत कुंटे, जलजा शिरोळे, अरविंद पटवर्धन, माधव सपकाळ, जयंत गोखले, रमेश विपट, विनय मराठे, अजय मोघे, मधुरा पाटील, विराज ढोकळे, रणजीत चमले, आदित्य राऊत, युगा बिरनाळे, संजय करंदीकर, संजय अगरवाल, केदार दीक्षित, सुनील बाब्रस, सुजाता बाब्रस, शरद कुलकर्णी, शंतनू पवार मृणालिनी कुंटे, मनोज एरंडे, अस्मिता कर्णिक आदींचा समावेश आहे.

कलावंतांचा मेळाव्याच्या माध्यमातून पाठिंबा –

पुणे हे सांस्कृतिक शहर आहेच, या शहराचे महत्त्व वाढावे, यासाठी कलेच्या जोपासनेसाठी आवश्यक ते सर्व करू, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी दिले.

कोथरूडमधील चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, नृत्य व अन्य कला क्षेत्रातील कलाकारांशी मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, सिने दिग्दर्शक राजदत्तजी, प्रसिद्ध संगीत नाट्य अभिनेत्री कीर्ती शिलेदार, इतिहास अभ्यासक गो. ब. देगलूरकर, प्रसिद्ध सिने अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, प्रसिद्ध सितार वादक उस्ताद उस्मान खाँ साहेब, यांच्यासह मराठी चित्रपट, नाटक,  संगीत, साहित्य, नृत्य व अन्य कला क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “गेल्या पाच वर्षात आपल्या सरकारने पोटाची भूक भागविणाऱया ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करुन, इथल्या जनतेसाठी अनेक योजना राबविल्या. आता मनाची भूक भागवण्यासोबतच बुद्धीची भूक भागवणं गरजेचं आहे. यासाठी पुढील पाच वर्षात युती सरकारचा नक्कीच प्रयत्न राहिल.” सांस्कृतिक क्षेत्रातही सकस अभिरुची जोपासण्यासाठी आगामी काळात आकांक्षी प्रकल्प हाती घेतले जातील “असेही ते यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील उमेदवारीवर राजकारण करणाऱ्यांना लक्ष्य करुन सिनेदिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीच्या प्रभावामुळे आज भारताला जगमान्यता मिळाली आहे. संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. मग अशावेळी चंद्रकांत पाटील यांच्या पाठिशी कोथरूडची जनता नक्कीच उभे राहील. तसेच सर्व कलाकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहून, सोशल मीडिया अथवा इतर माध्यमांद्वारे मतदारांना आवाहन केले पाहिजे, असे आवाहनही तरडे यांनी केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी