प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेवर महापालिका विकसीत करणार मैदाने, उद्याने

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा नाममात्र एक रुपया दराने घेण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. या जागेवर नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्या जागांवर पालिका खेळाचे मैदान, उद्यान विकसित करणार आहे. प्राधिकरणाच्या जागा प्राधिकरण देणार असून गायरान जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळणार असून प्रक्रिया त्वरित केली जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d78097b-a836-11e8-9f89-cb495fc8b10a’]

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडील मोकळ्या जागा विकसित करण्यासाठी महापालिकेस हस्तांतरित करण्याबाबत आज (शुक्रवारी) महापौरकक्षात बैठक झाली. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके उपस्थित होते. त्यानंतर महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी बैठकीतील माहिती दिली.

महापौर जाधव म्हणाले, वाकड, सेक्टर क्रमांक १३, १६, १४ आणि २० यासह विविध भागात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मोकळे भुखंड आहेत. त्या जागांचा उपयोग केला जात नाही. त्या जागा महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. त्याचा नागरी सुविधांसाठी उपयोग केला जाईल. त्यावर खेळाचे मैदान, उद्यान विकसित करण्यात येईल. त्याच्यावर पालिकेचा हक्क राहणार आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK,B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a3a5003c-a836-11e8-883b-8b9a4fa59540′]
प्राधिकरणाने जागा हस्तांतरित करण्याची तयारी दर्शविली आहे. जागा हस्तांतरणाचे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे त्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल. प्राधिकरण प्राधिकरणाच्या जागा देईल आणि गायरान जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.