IPL पेक्षा PSL चांगली, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूचे विचित्र विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळत आहे. या दरम्यान स्टेनने विचित्र विधान करत पीएसएलला आयपीएलपेक्षा चांगली लीग असल्याचे म्हंटले आहे. डेल स्टेन म्हणाला कि, आयपीएलपेक्षा पीएसएलमध्ये खेळणे अधिक फायद्याचे आहे. पीएसएलमध्ये आयपीएलपेक्षा क्रिकेटवर जास्त जोर देण्यात आला आहे.

डेल स्टेनने एका पाकिस्तानी वृत्तपत्राला सांगितले की, ‘तुम्ही आयपीएलमध्ये जाता तेव्हा मोठी स्क्वॉड आणि मोठे फ्लेयर्स असतात. तसेच खेळाडूंच्या कमाईवरही खूप जोर दिला जातो. या सगळ्यामध्ये कधीकधी क्रिकेटचा विसर पडतो. जेव्हा आपण पीएसएल आणि लंका प्रीमियर लीग खेळायला जाता तेव्हा तेथे क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जाते. मला आयपीएलपासून दूर राहून खेळावर अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. मला पीएसएलसारख्या स्पर्धेत खेळायचे होते, जिथे क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जाते.

दरम्यान, मागील वर्षीपर्यंत डेल स्टेन आयपीएलमध्ये खेळत होता. डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुकडून तो खेळला आहे. आयपीएल 2020 मध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब होती. मात्र आयपीएल 2021 च्या सीजनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॅनची कामगिरी खूपच खराब होती. स्टेनला आरसीबीकडून 133 च्या खराब सरासरीने 3 सामन्यात फक्त एक विकेट घेता आली . सध्याच्या पीएसएल 2021 च्या सीजनमध्ये तो क्वेटा ग्लेडिएटर्स संघाचा सदस्य आहे.