खळबळजनक ! आता ‘प्लाझ्मा’विक्रीचा देखील गोरखधंदा, दिल्ली ‘कनेक्शन’ समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्लाझ्मा थेरपीचा वापर मदतगार ठरत आहे. परंतु राज्यात या थेरपीसाठी अद्याप ठोस नियमावली जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्लाझ्माचीही विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीमध्ये सुरु झालेल्या प्लाझ्मा विक्रीच्या गैरप्रकारांना पाय फुटले असून पैसे मोजण्याची तयारी असेल, तर प्लाझ्मा देणारे दाते दिल्लीहून मुंबईलाही पाठवण्यात ये असल्याचे समोर आला आहे. या प्लाझ्मासाठी 80 हजार रुपये आकारले जातात. प्रवासाचा खर्च प्लाझ्माची गरज असलेल्या व्यक्तीला करावा लागतो. कोरोनामुक्त झालेल्या काही बेरोजगार तरुणांनी प्लाझ्मा विकण्याचा मार्ग स्वकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्लाझ्माची विक्री करणाऱ्या तरुणाकडून एका वृत्तवाहिनीने माहिती घेतली, गाडी पाठवण्याची किंवा प्रवास खर्च देण्याची तयारी असेल, तर मुंबईला दाता पाठवण्यात येतो अशी माहिती समोर आली आहे. प्लाझ्मा दान करणारा तरुण हा कोरोनामुक्त असून तो प्लाझ्मा देण्यासाठी योग्य असल्याची खातजमा करणारे वैद्यकीय चाणचण्याचे अहवालही या तरुणाने पाठवून दिले.

वेगवेगळ्या रक्तगटाचे तरुण संपर्कात
कोरोना झालेल्या या तरुणाला दिल्लीमध्ये क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी त्याची ओळख कोरोनातून बरे झालेल्या इतर तरुणांशी झाली. कोरोनातून बरे झाल्यानंतर वेगवेगळ्या रक्तगटाचे हे तरुण एकमेकांच्या संपर्कात होते. रुग्णालयातून प्लाझ्मासाठी दोन ते तीन लाख रुपयाची मागणी केली जाते. पैसे कमी करून मागितले तर दाता आणण्यास सांगितले जाते. यामुळे या तरुणांनी प्लाझ्मादान करून पैसे कमावण्याचा मार्ग स्विकारलाय.

प्लाझ्मादान करण्यासाठी तयार असलेल्या तरुणाला 17 एप्रिल रोजी कोरोना झाला. यानंतर त्याला 23 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले. 18 मे रोजी त्याची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आला. मुंबईमध्ये वांद्रे येथील रुग्णालयात जून महिन्यात या दात्याने प्लाझ्मा दान केला होता. त्यासाठी त्याला 80 हजार रुपये देण्यात आले. ए, बी, ओ रक्तगट दुर्मिळ असल्याने रुग्णालयाकडून तीन ते साडेतीन लाख रुपये घेतले जातात. हा दाता 31 वर्षाचा आहे. प्लाझ्मा देण्यापूर्वी सीबीसीच्या चाचण्या करून प्लाझ्माची तपासणी केली जाते. याचे अहवाल व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले जातात.

कोरोनाच्या काळात अशा प्रकारे प्लाझामाचा गोरखधंदा सुरु असून शासनाने यावर ठोस पावलं उचलणे गरजेचे आहे. सध्या प्लाझ्माचा काळाबाजार करणारी टोळी सक्रीय असल्याचे या प्रकरणावरून दिसून येते. ज्या तरुणाने याबाबत माहिती दिली हा टोळीचा छोटासा हिस्सा असू शकतो. या टोळीविरुद्ध सरकारने ठोस पावलं उचलून कडक कारवाई करून रुग्णांची होणारी आर्थिक पिळणूक थांबवली पाहिजे