Plea Against Misuse Of ED And CBI | केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर, देशातील विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Plea Against Misuse Of ED And CBI | भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकार (Central Government) केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (Central Bureau of Investigation (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate (ED) सारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याप्रकरणी देशातील 14 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीवर अटकेची कारवाई (Plea Against Misuse Of ED And CBI) करण्याच्या संदर्भात न्यायालयानं मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) घालून द्यावीत, अशी मागणी देशातील राजकीय पक्षांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या पक्षांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Indian National Congress), तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress), डीएमके (DMK), भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti) आणि राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) यांचा समावेश आहे. याचिकेतून ईडी तसेच न्यायालयांना अटक आणि ताब्यात घेण्यावरून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड
(Chief Justice D. Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर 5 एप्रिल रोजी सुनाणी होणार आहे.
मोदी सरकार (Modi Government) आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांनी
(Plea Against Misuse Of ED And CBI) केलेल्या 95 टक्के कारवाया भाजपविरोधी पक्षाशी संबंधित
लोकांवर केल्या आहेत. हा सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे. त्यामुळे न्यायालयानं तपास यंत्रणांसाठी अटकपूर्व
आणि अटकेनंतरची मार्गदर्शक तत्त्वे घालून द्यावीत, अशी मागणी केल्याची संघवी यांनी सांगितले.
तसेच सध्या सुरु असलेल्या प्रकरणांच्या तपासात अडथळा आणण्याचा आमचा हेतू नाही.
संकटात असलेल्या लोकशाहीला वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याचा याचिकाकर्त्या पक्षांचा दावा असल्याचे
सिंघवी यांनी सांगितलं.
Web Title :-Plea Against Misuse Of ED And CBI | Misuse of ED, CBI by the central government, opposition parties move the Supreme Court
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update