पर्यटकांनो लक्ष द्या ! सिंहगड, खडकवासला परिसरात जाताय, मग ‘हे’ वाचाच

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पर्यटनस्थळे (Tourist places) पर्य़टकांसाठी बंद आहेत. मात्र लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता केल्यानंतर गेल्या रविवारी (दि.13) सिंहगड किल्ल्यावर पर्यटकां ( (Tourist ) नी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाले होते. या पार्श्वभूमीवर हवेली पोलीसांनी नियम मोडणा-या पर्यटकां( (Tourist)वर कडक कारवाई करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. Please Attention tourists ! those who are going in Sinhagad fort and Khadakwasla area read this one

आता खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी 500 रुपये दंड (fined Rs 500 Against who visiting Sinhagad, Khadakwasla area) आकारला जाणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल FIR Was Lodged केला जाणार असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar) यांनी दिली आहे.

पोलीस निरीक्षक शेलार म्हणाले की, सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा,(Nanded Fata) खडकवासला धरण चौक,(Khadakwasla Dam Chowk) डोणजे फाटा,(Donje Fata) गोळेवाडी चेक पोस्ट, (Golewadi Check Post) खेड शिवापूर (Khed Shivapur) कडून येणारांसाठी कोंढणपूर फाटा अशा ठिकाणी कडक बंदोबस्त व नाकाबंदी केली जाणार आहे. त्याकरिता जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही शनिवार, रविवार तसेच इतर दिवशी नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन शेलार यांनी केले आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Please Attention tourists ! those who are going in Sinhagad fort and Khadakwasla area read this one

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित