फेसबुक वापरकर्त्यांनी तात्काळ बदलावा पासवर्ड, अन्यथा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे जगभरात कोरोना रुग्णाची रुग्णसंख्या १ कोटी ६ लाखांच्या वरती गेली असताना, आणखी एक संकट नागरिकांसमोर उभे ठाकले आहे. ते म्हणजे हॅकिंगचं आणि व्हायरसचं. कोरोनासोबतच आता तुमच्या फोन आणि लॅपटॉपमध्ये व्हायरसचा हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी व्हायरस अ‍ॅप्स ही एक मोठी समस्या बनली असून, तुम्ही जर फोनवरुन फेसबुक वापरत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

संशोधकाच्या मते, गुगल प्ले स्टोअरवरती २५ धोकादायक अशी अँड्रॉइड अ‍ॅप्स असल्याचं सांगितली जात आहेत. ज्या माध्यमातून फेसबुकचा पासवर्ड चोरला जाऊ शकतो. त्या अ‍ॅपच्या मदतीनं फेसबुक हॅक करुन तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो. ही अ‍ॅप्स जगभरात २.३ दशलक्षांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आली आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितलं की, वॉलपेपर किंवा गेम्स अ‍ॅप्स मधून ते तुमच्या मोबाईलमध्ये शिरकाव करतात. या छोट्या अ‍ॅप्सच्या साहाय्याने हॅकर्स तुमच्या फोनवर फेसबुकवर नजर ठेवू शकतात.

टिकटॉक हे प्रत्येकाच्या पसंतीचं अ‍ॅप. आजकाल लहान मुलापासून ते वयस्कर नागरिकांपर्यंत प्रत्येकजण ह्या अ‍ॅपचा वापर करत होते. पण आता भारत सरकारने या अ‍ॅपवरती बंदी आणलेली आहे. टिकटॉक हे चिनी अ‍ॅप असून, चीनकडून सायबर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने टिकटॉकसह ५९ चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.