Lockdown च्या काळात सुतारदरा टेकडीची ‘लचकेतोड’ करून प्लॉटिंग व बांधकामे, नगरसेवक दिपक मानकर यांच्या तक्रारीनंतर प्रशासन हलले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात लॉकडाऊन असताना सुतारदरा येथील बीडीपी अर्थात बायोडायव्हर्ससिटी पार्क म्हणून जाहीर करण्यात आलेल्या टेकडीची लचकेतोड करून फक्त प्लॉटिंगच न्हवे तर बांधकामेही करण्यात आली आहेत. स्थानिक राजकीय पुढारी आणि प्रशासनाच्या संगनमतानेच ही अनधिकृत बांधकामे झाल्याचा आरोप झाल्यानंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनाने येथील तब्बल १५० घरांना नोटीस दिल्या आहेत.

कोथरूड जवळ सुतारदरा येथे वनविभागा लगत टेकडी आहे. प्रभाग क्र. ११ मधील कोथरूड सर्व्हे नं. ११२ मधील रामबाग कॉलनी आणि शिवतिर्थनगर दरम्यानच्या या टेकडीवर जाण्यासाठी रस्ता करण्यात आला आहेे. अगदी उरावर येईल अशा या रस्त्याच्या बाजूने आणि टेकडीवर छोटे प्लॉटिंग करण्यात आले आहे.

लॉकडाऊन च्या काळात व त्यापूर्वी पासून याठिकाणी बांधकामे झाली आहेत. अगदी दुमजली बंगलो पासून टुमदार घरे आहेत. तर काहीं मजुरांची छोटी छोटी घरे आहेत. टेकडीवर वरील बाजूस गेल्यावर तेथे प्लॉटिंग करण्यात आले आहेत. एवढेच न्हवे तर ड्रेनेज लाईन्स व चेंबर्स, वीज कनेक्शनस ही करण्यात आली आहेत. वास्तविकता हा भाग डोंगर माथ्यावर असून या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही. पाणी पुरवठ्याची कुठलिही योजना नाही. जवळच असलेली दगडखाणीत पावसाचे मोठ्याप्रमाणात पाणी असते. अशा धोकादायक ठिकाणी एवढ्या मोठ्याप्रणावर टेकडी फोडून बांधकाम सुरू असताना प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होते. याठिकाणी काही राजकीय मंडळी आणि प्रशासन यांच्याच संगनमताने टेकडीची लाचकेतोड सुरू तक्रारी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने या परिसरातील बांधकामे आणि प्लॉट मालकांना नोटिसेस दिल्या आहेत.

बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू

सुतारदरा येथील टेकडीवर सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत तक्रारी आल्या आहेत. येथे सुरू असलेल्या १५ बांधकामांना नोटीसेस दिल्या आहेत. तसेच उर्वरीत बांधकामांची माहिती घेउन नोटीसेस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोनामुळे मध्यंतरीच्या काळात प्रशासन आरोग्य यंत्रणेत व्यस्त असल्याने कार्यवाहीला काहीसा विलंब लागत होता. परंतू येत्या काळात येथील बेकायदा बांधकामांबाबत कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात तहसीलदार कार्यालयासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

– राजेंद्र राउत, प्रभारी नगर अभियंता, पुणे महापालिका.

राजकिय पुढारी व अधिकार्‍यांच्या संगनमताने बीडीपीच्या जागेत प्लॉटींग, संबधितांवर कारवाई करावी – दिपक मानकर, माजी उपमहापौर व स्थानीक नगरसेवक.

सुतारदरा टेकडीवरील अनधिकृत प्लॉटींग आणि बांधकामांबाबत नगरसेवक दिपक मानकर यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात दिपक मानकर यांनी सांगितले, की महापालिका आयुक्तांची भेट घेउन त्यांना अनधिकृतपणे टेकडी फोडून सुरू असलेले प्लॉटींग व बांधकामांबाबत तक्रार केली आहे. बीडीपी या ना विकास झोनमध्ये सर्रास टेकडीफोड करून जमिनीचे सपाटीकरण करून १०० हून अधिक प्लॉटस् करण्यात आले आहेत. छोट्या आकाराचे हे प्लॉटस् कायदेशीर असल्याचे सांगून कमी किमंतीत विकण्यात येत आहेत. येथील बहुतांश कष्टकरी वर्गातील आहेत. हे प्लॉटस् बेकायदेशीर असून आपली फसवणूक झाल्याची कल्पना नसल्याने ही मंडळीही याठिकाणी अगदी दुमजलीही घरे बांधत आहेत. लॉकडाउनच्या काळात एप्रिल महिन्यापासून बिनदिक्कतपणे हे काम सुरू असताना प्रशासनाला सुगावा लागत नाही. स्थानीक राजकिय पुढारी व अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही. प्रशासनाने संबधितांवर कारवाई करून फसवणूक होत असलेल्या सर्वसामान्यांना न्याय द्यावा.