PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या लसीकरण (Vaccination) धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज महत्त्वाची घोषणा केली आहे. देशातील लसीकरण (Vaccination) कार्यक्रम सुरु झाल्यानंतर केंद्र सरकारने (Central Government) केवळ कोविड योद्धे आणि 45 वर्षापुढील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी घेतली होती.

केंद्र सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात परवानगी दिली. परंतु याची जबाबदारी राज्यांवर टाकली होती. मात्र, आता 18 वर्षापुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.

काय म्हणाले PM मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यात ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वत: लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे देखील वाचा

‘पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती’, ….

CM उद्धव ठाकरे घेणार मंगळवारी पंतप्रधान मोदींची भेट; …

PM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

पाण्याच्या टाकीतील मृतदेह गुढ उकलले ! चार दिवसांनंतर पत्नीने दिली कबुली; म्हणाली – ‘हा, मैने किया मर्डर

Pune Fire News | पिरंगुट भागातील सॅनीटायझर बनविणाऱ्या कंपनीत भीषण आग (व्हिडिओ)

जाणून घ्या अँड्रॉयड युजर्संसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे ‘फ्लॅश कॉल्स’ फीचर

Helmets New Rule : केंद्र सरकारकडून हेल्मेटबाबतचे नवीन नियम लागू ! 5 लाखांचा दंड अन् 1 वर्षाची कैद, जाणून घ्या

IPL चे उर्वरित सामने ‘या’ दिवसापासून सुरु होणार; फायनल दसऱ्याला ?, जाणून घ्या

 

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा
Web Title : pm addresses the nation over covid 19 free vaccine for above 18