कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांची मदत करणार मोदी सरकार, PM केयर्समधून दिला जाईल मासिक भत्ता आणि 10 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटात आपले आई-वडील गमावलेल्या मुलांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने नवीन मोहिम सुरू केली आहे. कोविड प्रभावित मुलांच्या सशक्तिकरणासाठी पीएम केयर्स फॉर चिल्ड्रन- इम्पॉवरमेंट सुरू करण्यात आले आहे. या मुलांना 18 वर्षाच्या वयानंतर मासिक भत्ता आणि 23 वर्षाच्या वयात पीएम केयर्समधून PM Cares 10 लाख रुपयांचा निधी दिला जाईल. पीएम केयर्स फंडमधून अशा मुलांना 18 वर्षाच्या वयानंतर मासिक भत्ता मिळेल. तर 23 वर्षाचे झाल्यानंतर 10 लाख रुपये फंड दिला जाईल. सोबतच कोविड अशा मुलांना नि:शुल्क शिक्षण दिले जाईल. सरकार अशा मुलांना उच्च शिक्षणासाठी शिक्षण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत करेल आणि पीएम केयर्सद्वारे कर्जाचे व्याज भरेल.

मुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन

पीएम मोदी यांनी म्हटले की, मुले देशाच्या भविष्याचे प्रतिनिधीत्व करतात आणि आम्ही मुलांचे समर्थन आणि सुरक्षेसाठी सर्वकाही करू. एक समाज म्हणून आमचे कर्तव्य आहे की, आपण या मुलांची देखभाल करावी आणि एक उज्ज्वल भविष्याची आशा करावी.

सोबतच सरकार कोविड-19 मुळे आपले पालक गमावणार्‍या मुलांना 18 वर्षाच्या वयापर्यंत पाच लाख रुपयांचा मोफत विमा देईल, प्रीमियमचा भरणा पीएम केयर्स PM Cares फंडमधून केला जाईल.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार