दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ ; मोदींच्या प्रचाराचा बिगुल शिर्डीतून 

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – ‘महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळं दुष्काळाचं सावट आहे. राज्य सरकार त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते आहेच, पण काही मदत लागलीच तर महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ. पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत करू,’ असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डी येथे बोलताना दिला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’01691e7e-d384-11e8-8855-51bb14b6201a’]

शिर्डी साई समाधीच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आले होते. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना चावी वाटपासह अनेक विकासकामांचं लोकार्पण यावेळी त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. भाषणाची सुरुवात मराठीतून करताना शिर्डीत येता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. तसंच, राज्य सरकारच्या कामाचंही कौतुक केलं. ‘दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. जलयुक्त शिवारातून १६ हजार गावं दुष्काळमुक्त झाली आहेत. आणखी नऊ हजार गावं दुष्काळमुक्तीच्या मार्गावर आहेत,’ असं मोदी म्हणाले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’073de237-d384-11e8-b8be-1d501c1487de’]

 घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचाही पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला. घर देण्याचे प्रयत्न यापूर्वी सुद्धा झाले. अनेक योजना होत्या. मात्र, गरिबांना सशक्त करण्याऐवजी एका कुटुंबाचा उदो उदो करण्यात हेतू त्यामागे होता. व्होट बँक तयार करण्याचा उद्देश होता, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0d0e6111-d384-11e8-a26c-2178fa20dc21′]गेल्या चार वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने १ कोटी २५ लाख घरे बांधली आहेत. काँग्रेसच्या सरकारला हे काम करण्यासाठी २० वर्षे लागली असती, असं सांगून, सेवेची भावना मनात असली की काम वेगाने होते,’ असा टोला त्यांनी हाणला. ‘आयुषमान भारत’ योजनेचा आतापर्यंत १ लाख लोकांनी लाभ घेतला आहे. याच योजनेतून नवीन रुग्णालय उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असंही त्यांनी सांगितलं. आणि खऱ्या अर्थाने २०१९ च्या निवडणूक प्रचाराचा बिगुल शिर्डीच्या साईंच्या दरबारातून वाजला असे म्हणायला काहीच हरकत नाही.