PM Awas Yojana : पीएम आवास योजनेंतर्गत घर खरेदी करणे महागले, येथे चेक करा नवे दर आणि घराचे ‘लोकेशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री आवास योजना भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली स्कीम आहे, जिचा उद्देश शहरी आणि ग्रामीण भागात स्वस्त घरे उपलब्ध करून देणे आहे. परंतु या योजनेंतर्गत आता दिल्ली-एनसीआरच्या गाझियाबादमध्ये घर खरेदी करणे महागडे ठरणार आहे. गाझियाबादमध्ये पीएम आवास योजनेतील घरांच्या किंमतीमध्ये दिड लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गाझियाबाद विकास प्राधिकरणाने (जीडीए) परवडणार्‍या घरांच्या योजनेतील घरांच्या किंमती 15 टक्के वाढवल्या आहेत. शनिवारी जीडीए बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जाणून घ्या किती महागली घरे
या योजनेत घर खरेदी करण्यासाठी अडीच ते चार लाख रूपये जास्त मोजावे लागतील. तर, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांची किंमत सुद्धा दिड लाख रुपयांनी वाढवली आहे. आता या योजनेत 4.5 लाखऐवजी 6 लाख रुपयात घर मिळेल. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद शहरात गाझियाबाद डेव्हलपमेंट अथॉरिटी, पीएम आवास योजनेंतर्गत फ्लॅट्सची निर्मिती करते.

1056 घरे अजूनही शिल्लक
गाझियाबाद डेव्हलपमेंट अथॉरिटीने या योजनेंतर्गत 2067 घरे बनवली आहेत, ज्यापैकी 1056 घरे अजूनही शिल्लक आहेत. या शिल्लक घरांचे वाटप पहिले या, पहिले मिळवा, या स्कीम अंतर्गत केले जाईल. ही शिल्लक घरे नवीन वाढलेल्या किंमतीत विकली जातील.

येथे चेक करा घराचे लोकेशन आणि नवीन रेट
* इंद्रप्रस्थ योजना (वन बीएचके): 83-शिल्लक घरे, 17.50- जुना रेट, 20.00- नवा रेट
* कोयल अँक्लेव्ह (वन बीएचके): 136-शिल्लक घरे, 19.90-जुना रेट, 22.40- नवा रेट
* इंद्रप्रस्थ योजना (टू बीएचके): 190-शिल्लक घरे, 24.10-जुना रेट, 28.10- नवा रेट
* इंद्रप्रस्थ योजना (टू बीएचके): 250-शिल्लक घरे, 23.00-जुना रेट, 26.70- नवा रेट
* कोयल अँक्लेव्ह (टू बीएचके): 397-शिल्लक घरे, 27.60-जुना रेट, 30.90 -नवा रेट

2.50 लाखापर्यंत मिळतो फायदा
या योजनेंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणार्‍याला सीएलएसएस किंवा क्रेडिट लिंक्ड सबसिडी दिली जाते. म्हणजे घर खरेदी करण्यासाठी होम लोनवर व्याज सबसिडी दिली जाते. केंद्र सरकारने पीएम आवास योजनेंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. यातून 2.50 लाखपेक्षा जास्त मध्यवर्गीय कुटुंबांना लाभ मिळेल. ही केंद्र सरकारची स्पॉन्सर्ड स्कीम आहे, जी 25 जून, 2015 ला सुरू केली होती.