PM Awas Yojana Pune | प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पूर्ण अर्थसंकल्पीय तरतूद – हेमंत रासने

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – PM Awas Yojana Pune | प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ७० कोटी रुपयांची पूर्ण अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने (PMC Standing Committee) मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (PM Awas Yojana Pune)

 

रासने म्हणाले, महापालिका क्षेत्रात खराडी (Kharadi), वडगाव खुर्द (Wadgaon Khurd) येथे प्रत्येकी एक आणि हडपसर (Hadapsar) येथे तीन असे पाच प्रकल्प आवास योजनेअंतर्गत सुरू असून, २९१८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी अंदाजपत्रकात ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कोविड काळात (Covid-19) विविध प्रकारच्या आरोग्य विषयक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सर्वच भांडवली विकासकामांवरील तरतुदींमध्ये दहा टक्के कपात करण्यात आली होती. त्या प्रमाणे आवास योजनेच्या तरतुदीत सात कोटी रुपयांची कपात करण्यात आली होती. (PM Awas Yojana Pune)

 

रासने पुढे म्हणाले, मात्र या प्रकल्पांची महारेरा कायद्या (Maharera Act) अंतर्गत नोंदणी झाली असल्यामुळे निर्धारीत वेळेत लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देणे आवश्यक आहे. अन्यथा महारेराच्या वतीने दंड आकारला जाऊ शकतो. वेळेत काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने विशेष बाब म्हणून आवास योजनेतील निधीत १० टक्के कपात न करता, अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे पूर्ण ७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी निधी
शहराच्या विविध भागांमध्ये पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत (Under the Rainwater Management Project) विविध विकासकामे आणि देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे ३६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

रासने म्हणाले, शहरातील पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्याच्या अंतर्गत ही कामे करण्यात येणार आहेत.
त्यामध्ये नाला विकसित करणे, कल्व्हर्ट बांधणे, पावसाळी पाण्याच्या ड्रेनेज लाईन टाकणे अशा विकासकामांचा समावेश आहे.
कोथरुड (Kothrud), वारजे (Warje Malwadi), बावधन (Bavdhan), पाषाण (Pashan), धानोरी (Dhanori),
विश्रांतवाडी (Vishrantwadi), येरवडा मनोरुग्णालय (Yerwada Mental Hospital), विमाननगर (Viman Nagar),
वडगाव शेरी (Wadgaon Sheri), हडपसर (Hadapsar), कोंढवा (Kondhwa), शनिवार पेठ (Shaniwar Peth),
दत्तवाडी (Dattawadi), हिंगणे (Hingne Khurd), वडगाव (Wadgaon) आदी परिसरात ही विकासकामे (Development Work) होणार आहेत.

 

Web Title :- PM Awas Yojana Pune | Full Budgetary Provision for Pradhan Mantri Awas Yojana – Hemant Rasane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले’

 

Vinod Kambli-Sachin Tendulkar | माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळीनं ठोकलं अर्धशतक..! सचिनने ‘खास’ फोटो शेअर करत म्हणाला…

 

Nagpur Crime | चाकूने सपासप वार करून मित्राला संपवले