मोदी सरकारनं ‘पीएम रिलीफ फंडा’चं नाव बदललं, गॅझेट करून दिली माहिती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्र सरकारने पीएम रिलीफ फंडाचे नाव बदलून ‘पीएम केअर्स फंड’ केले आहे. सरकारने याबाबत एक पत्रकही जारी केले आहे. आतापासून पीएम रिलीफ फंडाला पीएम केअर्स फंड म्हणून ओळखले जाईल. माहितीनुसार, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधी देखील पीएम केअर्स फंडमध्ये जमा करण्यास परवानगी दिली जाईल. असे म्हटले जात आहे की, 2013 च्या पीएम रिलीफ फंडाच्या काही भागांमध्ये बदल करून पीएम केअर्स फंड बनविले आहेत.

3100 कोटी खर्च – या महिन्यात पंतप्रधान कार्यालयाने सांगितले कि, पंतप्रधान केअर्स फंडातून 3100 कोटी रुपये खर्च होतील. पीएमओने सांगितले की, व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी 2000 कोटी रुपये आणि प्रवासी कामगारांवर 1000 कोटी रुपये खर्च केले जातील.

ऑडिटची मागणी- दरम्यान, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान केअर्स फंडाच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. पीएम केअर्स फंडाचे ऑडिट झाले पाहिजे, असे राहुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने पीएम केअर्स फंडाचे ऑडिट करून हे पैसे कोणाला दिले व ते कोठे खर्च झाले हे सांगावे.

राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी दिला एका महिन्याचा पगार – राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधानांच्या राष्ट्रीय केअर्स फंडात एक महिन्याचा पगार जमा केला आहे. राष्ट्रपती भवनने ट्विट केले होते की, राष्ट्रपती कोविंद यांनी कोविड – 19 च्या संकटावर मात करण्यासाठी देशाच्या मदतीसाठी पंतप्रधान केअर्स फंडात एक महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन दिले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविड – 19 ला पराभूत करण्यासाठी मदत करण्यासाठी त्यांनी सर्व नागरिकांना पंतप्रधान केअर्स फंडामध्ये उदारपणे देणगी देण्याचे आवाहन केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like