Coronavirus : ‘कोरोना’ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र ‘सरकार’चा आणखी एक मोठा ‘निर्णय’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानुसार महाराष्ट्राची जबाबदारी नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व मंत्र्यांना एका पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेऊन महत्त्वाची भूमिका बजावावी अशा सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून मंत्र्यांना पत्राद्वारे देण्यात आले असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. गरजू आणि गरीबांना अन्न मिळेल, रेशन दुकानांचा पुरवठा थांबणार नाही, स्थानिक बाजारांमध्ये आवश्यक वस्तुंची टंचाई होऊ नये आणि दुकानं आणि बाजारात जास्तीच्या दर लावून नागरिकांची लुबाडणूक होऊन नये याची काळजी संबंधीत मंत्र्यांनी घ्यावी, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्र्यांनी आपले मतदारसंघासह इतर ठिकाणच्या प्रशासनाच्या संपर्कात रहून कोरोनासंदर्भातील स्थितीचा आढावा घ्यावा. तसचे विदेशातून आलेले प्रवासी क्वॉरंटाइनमध्ये आहेत की नाहीत, कोरोनाचे किती पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि किती रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेत रहावी असे मंत्र्यांना सांगण्यात आले आहे. कोरोनाची लागण आतापर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना झाली आहे. त्याचा प्रादुर्भाव समाजात होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कुणाकडे कोणत्या राज्याची जबाबदारी

महाराष्ट्र –  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर
झारखंड –  मुख्तार अब्बास नक्वी
उत्तर प्रदेश –  राजनाथसिंह, महेंद्र नाथ पांड्ये, संजीव बलयान, कृष्ण पाल गुर्जर
बिहार –       रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान
राजस्थान, पंजाब –  गजेंद्र सिंह शेखावत