PM मोदींची मोठी घोषणा ! 80 कोटी लोकांना नोव्हेंबर अखेरपर्यंत मिळणार 5 किलो गहू किंवा तांदूळ अन् 1 किलो दाळ

वृतसंस्था – कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. केंद्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर करीत आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाचा विस्तर केला असून ही योजना नोव्हेंबर अखेरपर्यंत चालणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत देशातील 80 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. प्रत्येक महिन्यात प्रत्येक कुटूंबाला 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ आणि 1 किलो दाळ मिळणार आहे. यावर केंद्र सरकार 90 हजार कोटी रूपये खर्च करणार आहे. गेल्या 3 महिन्यांपासून हे काम सरकार करतच आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेर पर्यंत या योजनेवर केंद्र सरकारचे तब्बल दीड लाख कोटी रूपये खर्च होणार आहेत. मोदींनी ही मोठी घोषणा देशातील सर्वसामान्यांसाठी केली आहे.