PAK ची फाटली ! भारतापासुन वाटतेय भिती, युध्द झालं तर जिंकण ‘अशक्य’, इम्रान खाननं सांगितलं

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानचे मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधान इम्रान खान युद्धाची भाषा करत आहेत. काश्मीर मुद्यावरून पाकिस्तान संयुक्त राष्ट्रातही तोंडावर पडला आहे. भारताची लष्करी ताकद माहित असताना आणि यापूर्वी युद्धात पराभव झाला असताना देखील पाकिस्तानकडून युद्धाची भाषा केली जात आहे.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. मात्र, त्यांनीच एका मुलाखतीमध्ये पराभव मान्य केला आहे. अल जहीराला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तानचा पराभव होईल अशी कबुली त्यांनी दिली आहे. भारताला अणुयुद्धाच्या धमकीबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी ही कबुली दिली आहे. तसेच पाकिस्तान कधीही आण्विक युद्धाला सुरुवात करणार नाही. मी युद्धविरोधी आहे. युद्ध हे समस्यांचे समाधान असू शकत नाही असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

मुलाखतीमध्ये पुढे बोलताना इम्रान खान म्हणाले, ज्यावेळी दोन अणवस्त्रधारी  देशे एकमेकांच्या विरोधात लढतात, त्यावेळी आण्विक युद्ध होण्याची दाट शक्यता असते. जर आम्ही भारताविरोधात हरत असू तर आम्ही एकतर आत्मसमर्पण करू किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढू. जेव्हा अण्वस्त्रधारी देश शेवटच्या श्वासापर्यंत लढतो तेव्हा त्याचे परिणाम वाईटच असतात. युद्ध झाले तर त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल अशी धमकी देखील यावेळी दिली.

You might also like