PM Jan Dhan Account | जर अजूनपर्यंत उघडले नसेल जनधन खाते तर आजच उघडा, मिळेल 1.30 लाखाचा फायदा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana PMJDY) अंतर्गत लोकांना बँकेत जनधन खाते (PM Jan Dhan Account) उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रमांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत गरीब व्यक्ती आपले बँक खाते Bank Account उघडू शकतात. ज्यामध्ये अनेक प्रकारेच विविध आर्थिक लाभ मिळतात. या लाभांबाबत जाणून घेवूयात…
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
1.30 लाख रुपयांचा लाभ
पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत उघडलेल्या अकाऊंटमध्ये अकाऊंट होल्डरला Account Holder एकुण 1.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. यामध्ये दुर्घटना विमा सुद्धा दिला जातो. अकाऊंट होल्डरला 1,00, 000 रुपयांचा दुर्घटना विमा Accident Insurance आणि सोबत 30,000 रुपयांचा जनरल इन्श्युरन्स दिला जातो. अशावेळी जर खातेधारकाचा अपघात झाला तर 30,000 रुपये दिले जातात. जर या दुर्घटनेत अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला तर एक लाख रुपये दिले जातात, म्हणजे एकुण मिळून 1.30 लाख रुपयांचा फायदा मिळतो.
–
काय आहे जनधन खाते ?
पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक प्रोग्राम आहे जो बँकिंग/बचत तसेच जमा खाते, प्रेषण, कर्ज, विमा, पेन्शनपर्यंत लाभ देते. हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आऊटलेटमध्ये उघडले जाऊ शकते. पीएमजेडीवाय खाते झीरो बॅलन्ससह उघडले जात आहे.
कसे उघडावे अकाऊंट ? (Jan Dhan Account)
पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत खाते पब्लिक सेक्टर बँकांमध्ये जास्त उघडले जाते. परंतु तुम्ही खासगी बँकेज सुद्धा तुमचे जनधन खाते उघडू शकता. जर तुमच्याकडे इतर कोणते सेव्हिंग खाते आहे तर तुम्ही ते जनधन खात्यात सुद्धा बदलू शकता. भारतात राहणारा कुणीही नागरिक, ज्याचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, जनधन खाते उघडू शकतो.
या कागदपत्रांची आहे आवश्यकता
जनधन खाते उघडण्यासाठी KYC च्या अंतर्गत कायदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे.
या कागदपत्रांच्या वापराने जनधन खाते उघडले जाऊ शकते.
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, Driving License वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड. MGNREGA Job Card
जनधन अकाऊंटमध्ये मिळतील हे फायदे
1. खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे झंझट नाही.
2. सेव्हिंग अकाऊंट Savings Account एवढे व्याज मिळत राहील.
3. मोबाइल बँकिंगची सुविधा सुद्धा फ्री.
4. प्रत्येक युजर्सला 2 लाख रुपयांपर्यंत दुर्घटना विमा कव्हर.
5. 10 हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्रॉफ्ट सुविधा.
6. कॅश काढण्यासाठी आणि शॉपिंगसाठी रुपे कार्ड मिळते.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
Web Titel : PM Jan Dhan Account if you can open pm jan dhan account then you will get more than 1 lakh rupees know about it
धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित