PM Jan-Dhan Account : तुमचे जन धन खाते आहे ? मग घ्या 1.3 लाखांचा लाभ, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण योजनेपैकी पंतप्रधान जनधन योजना PM Jan-Dhan Account (PMJDY) नागरिकांना उपयुक्त अशी योजना आहार. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत जनतेला जन धन खाते उघडण्याची सुविधा दिली गेली आहे. या योजनेमध्ये सर्वसामान्य गरीब लोकांचं बँक खाते ओपन करण्यात आले आहे. याचप्रमाणे कोणाचं जण धन खातं असेल तर याअंतर्गत वित्तिय लाभ देखील मिळणार आहे.
१. ३० लाख रुपयांचा लाभ –
या योजनेअंतर्गत ज्यांचं खात आहे, त्यांना १.३० लाखापर्यंत लाभ मिळणार आहे. यामध्ये अपघाती विमाही मिळतो. जण धन खातेधारकाला १ लाख रुपयांचा अपघात विमा आणि तीस हजार रुपयांचा जनरल विमा देण्यात आला आहे. या परिस्थितीत जर खातेदाराचा अपघात झाला तर तीस हजार रुपये दिले जातात. अपघाती खातेदाराचा मृत्यू झाल्यास १ लाख रुपये दिले जाते, अर्थात एकूण १.३० लाख रुपयांचा फायदा होतो.
या योजनेचा लाभ काय ?
> खात्यात कमीतकमी शिल्लक (Minimum balance) ठेवण्याची मर्यादा नाही.
> सेव्हिंग अकाउंट इतकेच व्याज मिळेल
> मोबाइल बँकिंगची मोफत सुविधा
> २ लाखापर्यंत अपघाती विमा कव्हर
> १० हजार रुपयांपर्यंक ओव्हरड्राफ्ट सुविधा
> रुपे कार्ड सुविधा
जण धन खाते कसे उघडाल ? PM Jan-Dhan Account
> PMJDY च्या माध्यमातून देशातील गरीब लोकांचे खाते झिरो बॅलेन्सवर बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जाते.
> जवळच्या बँकेत जाऊन तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा.
> अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएमएस कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल.
> PMJDY च्या वेबसाईटनुसार,Passport, Driving License, PAN Card Number, Voting Card, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्ड.
> भारतात राहणारा कुठलाही नागरिक ज्याचं वय १० वर्षांपेक्षा जास्त आहे ते.
‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या
पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !
TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’
Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या