
PM JanDhan Account | ‘या’ पध्दतीनं उघडा पीएम जनधन अकाऊंट, सरकार करते 1.3 लाख रुपयांची मदत; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM JanDhan Account | जर तुम्ही पंतप्रधान जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana PMJDY) अंतर्गत खाते उघडले नसेल तर ताबडतोब खाते (PM JanDhan Account) उघडा. हा सरकारकडून सुरू करण्यात आलेला सर्वात महत्वकांक्षी उपक्रम आहे. या योजनेंतर्गत गरीबातील गरीब व्यक्ती आपले बँक खाते उघडू शकतो. ज्यामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक लाभ मिळतात. या लाभांबाबत जाणून घेवूयात.
काय आहे जनधन खाते?
पंतप्रधान जनधन योजना PM JanDhan Account (PMJDY) सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक प्रोग्राम आहे जो बँकिंग/बचत तसेच जमा खाते, प्रेषण, कर्ज, विमा, पेन्शनपर्यंत लाभ देते. हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आऊटलेटमध्ये उघडले जाऊ शकते. पीएमजेडीवाय खाते झीरो बॅलन्ससह उघडले जात आहे.
मिळतो 1.30 लाख रुपयांचा लाभ
PM JanDhan Account (PMJDY) योजनेंतर्गत उघडलेल्या अकाऊंटमध्ये अकाऊंट होल्डरला एकुण 1.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. यामध्ये दुर्घटना विमा सुद्धा दिला जातो. अकाऊंट होल्डरला 1,00, 000 रुपयांचा दुर्घटना विमा आणि सोबत 30,000 रुपयांचा जनरल इन्श्युरन्स दिला जातो.
अशावेळी जर खातेधारकाचा अपघात झाला तर 30,000 रुपये दिले जातात. जर या दुर्घटनेत अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला तर एक लाख रुपये दिले जातात, म्हणजे एकुण मिळून 1.30 लाख रुपयांचा फायदा मिळतो.
कसे उघडावे खाते?
PMJDY योजनेंतर्गत खाते पब्लिक सेक्टर बँकांमध्ये जास्त उघडले जाते. परंतु तुम्ही खासगी बँकेज सुद्धा तुमचे जनधन खाते उघडू शकता. जर तुमच्याकडे इतर कोणते सेव्हिंग खाते आहे तर तुम्ही ते जनधन खात्यात सुद्धा बदलू शकता. भारतात राहणारा कुणीही नागरिक, ज्याचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, जनधन खाते उघडू शकतो.
या कागदपत्रांची आहे आवश्यकता
जनधन खाते उघडण्यासाठी KYC च्या अंतर्गत कायदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या वापराने जनधन खाते उघडले जाऊ शकते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड.
जनधन खात्यात मिळणारे फायदे
- खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे झंझट नाही.
- सेव्हिंग अकाऊंट एवढे व्याज मिळत राहील.
- मोबाइल बँकिंगची सुविधा सुद्धा फ्री.
- प्रत्येक युजर्सला 2 लाख रुपयांपर्यंत दुर्घटना विमा कव्हर.
- 10 हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्रॉफ्ट सुविधा.
- कॅश काढण्यासाठी आणि शॉपिंगसाठी रुपे कार्ड मिळते.
Web Title : PM JanDhan Account | pm jandhan account open and get benefits of rupees 1 lakh 30k know how
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sharad Pawar | शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘…तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढू’