PM Jeevan Jyoti Bima | 330 रुपयात मिळते दोन लाखाचे संरक्षण, जाणून घ्या कोण कसे घेऊ शकतात योजनेचा लाभ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Jeevan Jyoti Bima | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक स्वस्त मुदत विमा योजना आहे. या अंतर्गत, केवळ 330 रुपयांच्या प्रीमियमवर दरवर्षी 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास दाव्याची रक्कम त्याच्या नातेवाईकांना किंवा नॉमिनीला (नामांकित/सदस्य) दिली जाते. (PM Jeevan Jyoti Bima) या विमा योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि ही विमा योजना कशी घ्यावी ते जाणून घेवूयात…
PMJJBY 18 ते 50 वर्षे वयोगटातील ज्यांचे बँक खाते आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. तसेच, जे या योजनेत सामील होतात, त्यांनी खात्यातून ऑटो-डेबिट करण्यास संमती द्यायची असते.
2 लाख रुपयांची जीवन सुरक्षा 1 जून ते 31 मे या एक वर्षाच्या कालावधीसाठी आहे आणि ती नूतनीकरणीय आहे. योजनेअंतर्गत, विमाधारक व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास जोखीम संरक्षण दोन लाख रुपये आहे.
प्रीमियमची रक्कम दरवर्षी 330 रुपये आहे. ही रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यातून दरवर्षी एका हप्त्यात 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी ऑटो-डेबिट केली जाते. (PM Jeevan Jyoti Bima)
ही योजना लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) आणि इतर सर्व लाइफ इन्शुरन्सद्वारे ऑफर केली जाते.
योजनेच्या लाभाअंतर्गत, पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला ठरलेली रक्कम दिली जाईल.
म्हणजेच, जर त्या व्यक्तीचा कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला हा लाभ मिळू शकतो.
तुम्ही हा प्लान एलआयसी मार्फत घेऊ शकता, तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत देखील याबद्दल माहिती घेऊ शकता.
क्लेम मिळविण्यासाठी, तुम्हाला त्या विमा कंपनीकडे किंवा जिथून विमा काढला आहे त्या बँकेकडे जाऊन दावा करावा लागेल.
मृत्यू प्रमाणपत्रासोबत इतर आवश्यक कागदपत्रेही तेथे जोडावी लागतील.
हा टर्म इन्शुरन्स असल्याने, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच यामध्ये कव्हरेजचा लाभ मिळेल.
मुदत संपल्यानंतरही तो ठिक असेल तर योजनेंतर्गत कोणताही लाभ दिला जाणार नाही.
मात्र, इतर काही स्थिती आहेत ज्यामध्ये हा लाभ मिळत नाही.
Web Title :- PM Jeevan Jyoti Bima | pm jeevan jyoti bima scheme two lakh rupees cover is available for rs 330 know who can take benefit of the scheme
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील हत्याकांडातील आरोपीची निर्दोष मुक्तता