PM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन
नवी दिल्ली : (PM-Kisan ) पीएम किसान सम्मान निधी स्कीम (PM-Kisan ) चा नववा हप्ता पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. नवव्या हप्त्याची सुरुवात होण्यास केवळ 40 दिवसांचा वेळ शिल्लक आहे. त्यापूर्वी तुम्हा हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे की एप्रिल ते जुलैपर्यंत येणार्या हप्त्यांतर्गत आतापर्यंत किती शेतकर्यांना 2000-2000 रुपयांची मदत मिळाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) सांगितले की, या दरम्यान 10,34,32,471 लोक लाभान्वित झाले आहेत. मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये 10,49,20,156 शेतकर्यांना 2-2 हजार रुपये मिळाले होते.
म्हणजे आता पुढील 40 दिवसात 25-30 लाख आणि शेतकर्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पोहचू शकतात. यासाठी जानकारांचे म्हणणे आहे की, एप्रिल ते जुलैपर्यंत येणार्या हप्त्यासाठी आताही अर्ज करता येऊ शकतो. असे केल्यास नोव्हेंबर 2021 पर्यंत 4000 रुपये मिळू शकतात या स्कीमचे वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये रजिस्ट्रेशन खुले आहे आणि कोणीही शेतकरी (Farmer) कधीही अर्ज करू शकतो. यात नोंदणीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुविधा आहेत.
पीएम किसानसाठी असा करा ऑनलाइन अर्ज
-पीएम-किसानच्या पोर्टल (pmkisan.gov.in) वर क्लिक करा.
-याच्या फार्मर कार्नरच्या NEW FARMER REGISTRATION च्या पयार्यावर क्लिक करा.
-यानंतर जी विंडो ओपन होईल त्यामध्ये आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाका.
-यानंतर क्लिक हियर टू कंटिन्यूवर क्लिक करा.
-यामध्ये फॉर्म दिसेल, तो पूर्ण भरा.
-तो भरून सेव्ह करा. आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
पीएम किसान योजनेचा फायदा कुणाला मिळू शकतो
असे शेतकरी जे माजी किंवा सध्या संविधानिक पद धारक आहेत, वर्तमान किंवा माजी मंत्री आहेत, महापौर किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत, आमदार, खासदार आहेत त्यांना शेतकरी असले तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी आणि 10 हजारेपक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी यांना लाभ मिळणार नाही.
व्यवसायिक, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जे शेती करत असले तरी त्यांना लाभ मिळणार नाही.
इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी सुद्धा या लाभापासून वंचित असतील.
केंद्र आणि राज्य सरकारचा मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/गट डी कर्मचार्यांना लाभ मिळेल.
Web Titel : PM-Kisan | 10 crore 34 lakh farmers get the benefit of the eighth installment of pm kisan know eligibility how to apply aadhaar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
एक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ !