तीन दिवसानंतर जारी होईल PM Kisan योजनेचा 10वा हप्ता, जर नसेल यादीत नाव; ताबडतोब करा ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | आजपासून तीन दिवसांनी पीएम किसान (PM Kisan) योजनेचा 10वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहे. कारण शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे कळवण्यात आले आहे की 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतील. याचा फायदा सुमारे 12 कोटी शेतकर्‍यांना होणार आहे.

 

10 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर पाठवले जातील. जर तुम्ही अजून यादीत नाव पाहिले नसेल तर लगेच तपासून घ्या. कारण काही चुकांमुळे तुमचे नाव यादीतून काढून टाकले जाऊ शकते.

 

या व्यतिरिक्त जर तुमचे नाव या योजनेअंतर्गत यादीत नसेल तर तुम्ही काय करावे आणि तुम्ही त्याचा लाभ कसा घेऊ शकता याची माहिती येथे दिली आहे.

 

यादीत नाव नसल्यास येथे कॉल करा
तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधीच्या (pm kisan samman nidhi yojana) 10व्या हप्त्याच्या यादीत नसल्यास, तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या हेल्पलाइन 155261 आणि 011-24300606 नंबरवर कॉल करू शकता. येथे तुमचा संपूर्ण मुद्दा ऐकला जाईल आणि कमी वेळेत निकाली काढला जाईल.

ऑफलाइन देखील करू शकता काम
जर तुम्हाला फोन करायचा नसेल तर तुम्ही राज्य कृषी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकार्‍याला भेटून तुमची तक्रार नोंदवू शकता.
याशिवाय पीएम किसानच्या (PM Kisan) वेबसाइटवरही ऑनलाइन तक्रार नोंदवता येईल.

 

यादीत असे तपासा नाव

सर्वप्रथम पीएम किसानची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

त्यानंतर Farmers Corner च्या पर्यायावर क्लिक करा.

आता Beneficiaries List च्या पर्यायावर क्लिक करा.

येथे तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

यानंतर Get Report वर क्लिक करा. त्यानंतर संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल.

 

Web Title :- PM KIsan | 10th installment of pm kisan scheme will be released after three days if your name is not in list then do this work

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ration Card | देशातील कोणत्याही ठिकाणाहून तुम्हाला घ्यायचे असेल रेशन, तर करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 225 पेक्षा अधिक नवे रूग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून 5 कोटीच्या प्रकरणात खासगी सावकार नाना वाळके, अनिकेत हजारेला अटक