PM Kisan | पीएम किसान योजनेत महाराष्ट्रातील 4.45 लाख लाभार्थी अपात्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लोकसभेत सुजय पाटील, हिना गावित, श्रीकांत शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीची (PM Kisan Samman Nidhi) माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) लाभ देशातील अपात्र (Ineligible) असलेल्या 42 लाख 16 हजार 643 जणांनी घेतला आहे. त्यामुळे आता सरकारने या अपात्र लाभार्थ्यांना दिलेली मदत परत घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्याकडून 29, 927 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात येणार आहे. यामध्ये आसाम (8.35 लाख), तामिळनाडू (7.22 लाख), पंजाब (5.62 लाख) आणि महाराष्ट्रातील (4.45 लाख) आहेत.

महाराष्ट्रातील 4.45 लाभार्थी अपात्र

किसान सन्मान योजनेत महाराष्ट्रातील 1.14 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
त्यातील 1.10 कोटी शेतकऱ्यांना तीन हप्त्यात सहा हजार रुपये मदत त्यांच्या बँक खात्यात दिली गेली होती.
योजनेत महाराष्ट्रातील (Maharashtra) 1.45 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
त्यात 1.10 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले गेले.
लाभार्थी शेतकऱ्यांना सरासरी सहापेक्षा जास्त हप्त्यांत सरासरी 12,545 रुपये मिळाले आहेत.
दरम्यान, नरेंद्रसिंह तोमर यांनी या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची (Eligible farmers) नावे राज्य सरकारे करत असल्याचे स्पष्ट केले.

कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकरी?

अहमनगर (6.86 लाख), सोलापूर (6.20 लाख), कोल्हापूर (5.47 लाख), सातारा (5.29 लाख ) आणि पुण्यातील (5.14 लाख) सर्वाधिक शेतकरी योजनेचे लाभार्थी होते.ठाणे (1.19 लाख), नंदूरबार (1.28 लाख), पालघर (1.31 लाख), रायगड (1.52 लाख), गडचिरोली (1.52 लाख) आणि सिंधुदुर्गच्या (1.54 लाख) शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.

Web Title : pm kisan | 42 lakh ineligible beneficiaries pm kisan nidhi near about 4.45 lakh from maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | खुशखबर ! आता आई-वडील आणि ज्येष्ठांच्या देखरेखीसाठी मिळतील 10 हजार रुपये, मोदी सरकार बदलतंय ‘हा’ नियम

BJP MLA Gopichand Padalkar | ‘मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही’

Ajit Pawar | इलेक्ट्रीक गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार