PM-Kisan चं ‘पेमेंट’, ‘रजिस्ट्रेशन’ स्टेट्स माहिती करून घेणं झालं ‘एकदम’ सोपं, सरकारनं लॉन्च केलं खास App, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी पीएम-किसान योजनेच्या पाहिल्या वर्धपान दिनी सरकारने एक मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी हे अ‍ॅप आणले आहे. शेतकरी या अ‍ॅपद्वारे पेमेन्टची स्थिति, आधारकार्डद्वारे नावात सुधारणा, रजिस्ट्रेशन स्टेटस जाणून घेऊ शकतात. याशिवाय मोबाईल अ‍ॅपद्वारे योजनेच्या एलिजिबलिटीशी संबंधीत माहिती, हेल्पलाईन नंबर आणि रजिस्ट्रेशनशी संबंधीत अन्य फिचर्स प्राप्त करता येऊ शकतात. हे अ‍ॅप इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करणार्‍या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) डेव्हलप केले आहे.

पीएम किसानचे एक वर्ष
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेची सुरूवात 24 फेब्रुवारी 2019 ला उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमधून झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंग केला होता. पश्चिम बंगाल वगळता बाकी सर्व राज्यांनी ही योजना लागू केली असल्याचे कृषि मंत्रालयाने म्हटले आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकर्‍यांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.

पहिल्या वर्धापनदिनी चित्रकूटमध्ये कार्यक्रम
तोमर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये पीएम-किसान योजनेच्या पहिल्या वर्धापनदिनीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

आतापर्यंत 9.74 करोड शेतकर्‍यांना मिळाला फायदा
या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9.74 करोड शेतकर्‍यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार यापैकी 8.45 करोड शेतकर्‍यांना राज्य सरकारांकडून माहितीची सत्यता पडताळल्यानंतर रोख मदत पाठवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 14 करोड शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे.

केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी म्हटले की, या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी एक अ‍ॅप डेव्हलप करण्यात आले आहे. 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी या अ‍ॅपची सुरूवात महत्वपूर्ण ठरणार आहे.

या योजनेसाठी करा असे रजिस्ट्रेशन
पीएम किसान योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशनसाठी अगोदरपासून एक पोर्टल काम करत आहे. ही वेबसाईट रजिस्टर्ड शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठविण्यासाठी एन्ड टू एन्ड टेक्नॉलॉजी सोल्यूशनप्रमाणे काम करते. या पोर्टलवर फार्मर्स कॉर्नर आहे. जेथे शेतकरी स्वताच्या कॉमन सर्व्हिस सेंटर्सच्या मदतीने आपली ऑनलाइन रिक्वेस्ट नोंदवू शकतात. शेतकरी या पोर्टलद्वारे आपल्या अर्जाच्या स्थितीची माहिती घेऊ शकतात. तसेच नावात दुरूस्ती करू शकतात.