PM Kisan | 12 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! e-KYC पूर्ण केल्याशिवाय येणार नाही 10वा हप्ता, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | पीएम किसान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या 12 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी आहे. पीएम किसान सम्मान निधी योजना 2021 मध्ये (pm kisan samman nidhi yojana) मोदी सरकारने (Modi Government) मोठा बदल केला आहे. 15 डिसेंबरपर्यंत जारी होणार्‍या पुढील हप्त्याचे पैसे तुम्हाला तेव्हाच मिळतील, जेव्हा तुम्ही e-KYC पूर्ण कराल. अन्यथा तुमचा हप्ता रखडू शकतो. सरकारने या योजनेत हे अनिवार्य केले आहे. (PM Kisan)

 

पीएम किसानसाठी ई-केवायसी कसे कराव (How to complete e-KYC in PM Kisan Yojana)

1. यासाठी प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टल वर जा.

2. उजव्या कोपर्‍यात सर्वात वर eKYC लिहिले आहे त्यावर क्लिक करा.

3. आता आधार नंबर आणि इमेज कोड टाकून सर्च बटनवर क्लिक करा.

4. नंतर आधारसोबत लिंक मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाका.

5. सर्व ठिक असेल तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid लिहून येईल.

6. जर प्रक्रिया इनव्हॅलिड झाली तर आधार सेवा केंद्रावर जाऊन हे ठिक करा. (PM Kisan)

यांना मिळणार नाही हप्ता

जर तुमच्या कुटुंबात कुणीही टॅक्सपेयर असेल.

शेतीच्या जमीनीचा व्यावसायिक किंवा इतर वापर.

शेतीचे स्वता मालक नसणे.

नावावर शेती नसणे.

शेती आजोबा, वडीलांच्या नावावर असणे.

जमीनीचा मालक आहे, पण सरकार कर्मचारी आहे किंवा निवृत्त झाला असे.

विद्यमान आणि माजी खासदार, आमदार, मंत्री.

प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक.

शेतीचा मालक आहे, पण 10000 रुपयांपेक्षा जास्त महिना पेन्शन मिळत असेल.

 

Web Title :- PM Kisan | big change in pm kisan yojana 10th installment will not come without completing e kyc this is the way to complete it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Whatsapp Cryptocurrency Payment | ‘व्हॉट्सअप’ने केली घोषणा, आता क्रिप्टोकरन्सीमध्ये सुद्धा पैशांचा व्यवहार करू शकतात यूजर्स

Pune Crime | अबब ! पुण्यात चक्क वार्षिक 240 % व्याजदर; व्याजाच्या नावाखाली 12 लाखांची खंडणी मागणारा ‘सावकार’ गजाआड

Gold Price Today | गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी ! आजही सोन्याच्या भावात घसरण, चांदीही उतरली; जाणून घ्या

Pune Crime | पालघनचा धाक दाखवून उकळली खंडणी; पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रकार, दरोड्याचा गुन्हा दाखल

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलासा, कोर्टाकडून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती