PM Kisan e-KYC | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसानची e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan e-KYC | शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan e-KYC) राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा हप्ता तीन टप्प्यात दिला जातो. दरम्यान गेल्या महिन्यात या योजनेचा हप्ता जमा झाला नाही. अनेकजणांनी ई-केवायसी (e-KYC) केलं नसल्यानं हप्ता येण्यात अडचण होण्याची शक्यता आहे. दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक संधी दिली आहे. ई-केवायसी करण्याची तारीख 31 मे होती ती वाढवली आहे. पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करता येणार आहे.

 

कृषी अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, “ओटीपी किंवा बायोमेट्रिक पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी आजअखेर एकूण 4 लाख 98 हजार 80 शेतकऱ्यांपैकी केवळ 2 लाख 98 हजार 623 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित 2 लाख 79 हजार 457 ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहेत. तरी या लाभार्थ्यांनी तात्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे.” (PM Kisan e-KYC)

 

दरम्यान, पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक केले आहे. यासाठी 31 मे ही अंतिम तारीख निश्चित केली होती. जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी केले नाही तर पीएम किसानच्या माध्यमातून देण्यात येणारे त्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये, [email protected] शेतकरी वेबसाइटच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकतो.

 

पैसे जमा झालेत का ?, तपासा –

सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

यानंतर ‘Farmers Corner’ या ऑप्शनवर क्लिक करा.

त्यानंतर Beneficiary Status क्लिक करा.

आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.

त्यानंतर ‘Get Report’ पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.

या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता.

 

हप्ता न मिळाल्यास यावर करा संपर्क –

PM किसान टोल फ्री नंबर : 18001155266

पीएम किसान हेल्पलाईन नंबर : 155261

PM किसान लँडलाईन नंबर : 011 – 23381092, 23382401

पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर : 011 – 24300606

पीएम किसान हेल्पलाईन : 0120-6025109

ई – मेल आईडी : [email protected]

 

Web Title :- PM Kisan e-KYC | good news for farmers extension of pm kisan to e kyc

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा